युवतीचे अपहरण करून अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

नागपूर - युवतीचे स्कॉर्पिओतून अपहरण करून चालकाने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. ही घटना उघडकीस येताच अंबाझरी पोलिसांनी जलदगतीने तपासचक्र फिरवीत आरोपीला अटक केली. पप्पू शेख रशीद (२९, रा. ज्ञानेश्‍वर सोसायटी, मानकापूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तो रेल्वे अधिकाऱ्यांसाठी कंत्राटी स्वरूपात घेण्यात आलेले वाहन चालवितो. 

पीडित युवती मूळची मध्य प्रदेशातील असून, सध्या गांधीनगरातील वसतिगृहात राहते. शुक्रवारी तिची आई भेटण्यासाठी आली होती. दोघीही नातेवाइकांसह त्याच्या चारचाकी वाहनातून जेवण करण्यासाठी गेल्या होत्या. होस्टेलकडे परतत असताना आई आणि मुलीत वाद झाला. त्यामुळे पीडित युवती वाहनातून खाली उतरली. आईला सोडून नातेवाईक पुन्हा तिचा शोध घेण्यासाठी आला. तोवर स्कॉर्पिओचालक पप्पू तिथे आला.

मदतीची ग्वाही देत तिला सोबत घेऊन गेला होता. तिथे उपस्थित असणाऱ्यांनी सदर युवती सीजी ०४ - जेव्ही ५३०१ क्रमांकाच्या स्कॉर्पिओत बसून गेल्याचे सांगितले. नातेवाइकाने अंबाझरी स्थानक गाठून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी युवतीचा शोध सुरू केला. पप्पू प्रारंभी तिला रेल्वेस्थानकाजवळील डीआरएम कार्यालयात घेऊन गेला. आपले काम आटोपून तिला घेऊन सेमिनरी हिल्स परिसरातील निर्जनस्थळी घेऊन गेला. धमकी देऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. यानंतर मुलीला सोडून दिले. युवतीच्या शोधात असलेल्या पोलिसांना पीडित युवती एकटी फिरताना दिसली. चौकशीत तिने आपबीती सांगितली. पण, आरोपीचा नावपत्ता माहिती नसल्याने पोलिस तिला घेऊन रेल्वेस्थानक परिसरात गेले. तिथे चौकशीत आरोपीचे नाव पप्पू असल्याचे आणि तो ज्ञानेश्‍वर सोसायटीत राहत असल्याचे पुढे आले. त्याआधारावर पोलिसांनी ज्ञानेश्‍वर सोसायटीत पप्पूचे घर हुडकून काढत त्याच्या मुसक्‍या आवळल्या. त्याची स्कॉर्पिओ पोलिसांनी हस्तगत केली आहे.

Web Title: nagpur vidarbha news Atrocities by kidnapping the girl