संघ, भाजप कार्यकर्त्यांच्या हत्‍यांविरोधात संताप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

नागपूर - केरळमध्ये कम्युनिस्टांकडून संघ व भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येविरोधात शहर भाजपने सोमवारी संताप व्यक्त केला. आतापर्यंत १३१ हत्या होऊनही केरळ सरकार मौन  बाळगून असल्याचाही निषेध केला. ‘आम्ही बलिदान द्यायला तयार आहोत. परंतु, षंढाप्रमाणे मागे वार करण्याऐवजी हिंमत असेल, तर मर्दासारखे पुढे या’, असा इशाराही भाजपने दिला.

नागपूर - केरळमध्ये कम्युनिस्टांकडून संघ व भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येविरोधात शहर भाजपने सोमवारी संताप व्यक्त केला. आतापर्यंत १३१ हत्या होऊनही केरळ सरकार मौन  बाळगून असल्याचाही निषेध केला. ‘आम्ही बलिदान द्यायला तयार आहोत. परंतु, षंढाप्रमाणे मागे वार करण्याऐवजी हिंमत असेल, तर मर्दासारखे पुढे या’, असा इशाराही भाजपने दिला.

केरळमध्ये होणाऱ्या हत्या व डाव्या सरकारने घेतलेली बघ्याच्या भूमिकेविरोधात शहर भाजपने संविधान चौकात आंदोलन केले. आंदोलनाला शहर भाजपाध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ. मिलिंद माने, महापौर नंदा  जिचकार, शहर महामंत्री संदीप जोशी, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव, श्रीकांत देशपांडे, किशोर पलांदूरकर, धर्मपाल मेश्राम आदींनी केरळ सरकार व डाव्यांचा निषेध केला.

या वेळी नगरसेवक सर्वश्री नागेश सहारे, संजय बंगाले, मनोज चाफले, प्रदीप पोहाणे, निशांत गांधी, नगरसेविका वर्षा ठाकरे, चेतना टांक, डॉ. कीर्तिदा अजमेरा, लक्ष्मी यादव, देवेंद्र दस्तुरे, रमेश सिंगारे, प्रमोद पेंडके, माजी महापौर अर्चना डेहनकर, महेंद्र कटारिया, सुनील मिश्रा, जयप्रकाश गुप्ता, भूषण दडवे, शिवाणी दाणी, किशोर पाटील, कमलेश राठी, गुड्डूु शेख, फिरोज शेख, सतीश सिरसवॉन, कंचन करमरकर, मनीषा काशीकर यांच्यासह भाजप पदाधिकारी, नगरसेवक, महापालिकेतील पदाधिकारी, प्रभाग अध्यक्ष, कार्यकर्ते होते.

डाव्यांचा होणार नायनाट
दिवसेंदिवस जनाधारात घट होत असल्याने आलेल्या नैराश्‍यातून डाव्यांनी केरळमध्ये भाजप व संघ कार्यकर्त्यांच्या हत्या सुरू केल्या. मात्र, डाव्यांचा इतिहास हा रक्तरंजित क्रांतीचा असून, कधीही यशस्वी झाला नाही. भाजप व संघ कार्यकर्त्यांच्या हत्या होत असताना तेथील सरकार बघ्यांची भूमिका घेत आहे. आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केरळात पाऊल  ठेवले असून, डाव्यांचा नायनाट होणारच, असा विश्‍वास व्यक्त करीत वक्‍त्यांनी केरळ सरकारचा निषेध केला.

Web Title: nagpur vidarbha news bjp agitation