रक्तपेढ्यांमध्ये नाही रक्त विघटन प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

नागपूर - नागपूर विभागात उपराजधानीतील दोन आणि गडचिरोलीतील एक अशा तीन शासकीय रक्तपेढ्यांमध्ये अद्याप रक्त विघटन प्रकल्प नाही. लवकरच येथे हे प्रकल्प कार्यान्वित होऊन रुग्णांना दर्जेदार सेवा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभाग (औषध)चे नागपूर विभागाचे सहआयुक्त मोहन केकतपुरे यांनी आज येथे दिली. 

नागपूर - नागपूर विभागात उपराजधानीतील दोन आणि गडचिरोलीतील एक अशा तीन शासकीय रक्तपेढ्यांमध्ये अद्याप रक्त विघटन प्रकल्प नाही. लवकरच येथे हे प्रकल्प कार्यान्वित होऊन रुग्णांना दर्जेदार सेवा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभाग (औषध)चे नागपूर विभागाचे सहआयुक्त मोहन केकतपुरे यांनी आज येथे दिली. 

नागपूरच्या मेडिकलमध्ये शुक्रवार १५ सप्टेंबरपासून ‘चांगल्या रक्तपेढीचा वापर’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर केकतपुरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुमारे १०० वर्षांपूर्वीची रक्तपेढी आणि आताची रक्तपेढी यात काळानुरूप बदल झाले आहेत. आता रक्तातील विविध घटक वेगळे करून आवश्‍यकता असेल तेच घटक दिले जातात. लाल पेशी, प्लाझ्मा, प्लेटलेटस्‌ आणि इतर घटकच रुग्णांना गरजेनुसार दिले जातात. यामुळे रुग्णांची सुरक्षितता वाढली आहे. नागपूर 
विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या सहा जिल्ह्यांत एकूण २५ रक्तपेढ्या आहेत. त्यातील १४ नागपुरात आहेत. विभागातील बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये रक्त विघटन प्रकल्प आहे. परंतु नागपूरच्या सुपर स्पेशालिटी, डागा शासकीय स्मृती स्त्री रुग्णालय आणि गडचिरोलीच्या एका शासकीय रुग्णालयात अद्याप हा प्रकल्प नाही. तिन्ही ठिकाणी हे प्रकल्प शासनाने मंजूर केले असून विविध प्रक्रिया सुरू असल्याचे त्या संस्थेकडून एफडीएला निरीक्षणात सांगण्यात आले आहे. तेव्हा लवकरच तेथेही हे प्रकल्प  कार्यान्वित होण्याची आशा आहे. प्रत्येक रक्तपेढीमध्ये सेवा देणाऱ्या तंत्रज्ञांपासून डॉक्‍टरांना चांगल्या रक्तपेढीच्यास वापरावर वेळोवेळी  माहिती देणे गरजेचे आहे. 

एफडीए, नागपूर व इंडियन सोसायटी ऑफ ट्रान्सफ्युजन मेडिसीन ॲण्ड ब्लड बॅंक, फेडरेशन ऑफ नागपूर ब्लड बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने मेडिकलमध्ये दोन दिवसीय परिषद घेण्यात येत आहे. परिषदेत विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगडमधूनही २२०० प्रतिनिधी सहभागी होतील. डॉ. हरीश वरभे उपस्थित होते. 

आज उद्‌घाटन  
शुक्रवार सकाळी १० वाजता मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या हस्ते चांगल्या रक्ताचा वापर या विषयावरील कार्यशाळेचे उद्‌घाटन होईल. यावेळी टाटा कॅन्सर रुग्णालयाचे डॉ. रजाध्यक्षा, हिंदुजा रुग्णालयाचे डॉ. आनंद देशपांडे, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे माजी सहसंचालक डॉ. संजय जाधव आपले अनुभव कथन करतील.

Web Title: nagpur vidarbha news Blood disinfection project in blood bank