विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे भव्‍य स्वागत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

नागपूर - राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहरात आगमन झाले. त्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ऐतिहासिक कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी हजारो शेतकरी तसेच लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने विमानतळावर स्वागतासाठी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे शासकीय विमानाने विमानतळावर आगमन झाले. या वेळी केंद्रीय  भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसह जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, आमदार सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, डॉ. आशीष देखमुख, डॉ. मिलिंद माने, सुधीर पारवे, मल्लिाकार्जुन रेड्डी, विकास कुंभारे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, जयप्रकाश गुप्ता, अशोक धोटे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महापालिका आयुक्त अश्‍विन मुद्‌गल, अतिरिक्त पोलिस आयुक्त शिवाजीराव बोडखे उपस्थित होते. शेतकऱ्यांना दिलेल्या ऐतिहासिक कर्जमाफीचा आनंद व्यक्त करण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी विमानतळावर मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती.

कर्जमाफीदिल्याबद्दल ढोल-ताशे वाजवून आनंद व्यक्त केला. देशाच्या इतिहासातील ही सर्वाधिक कर्जमाफी असून, ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा  होणार आहे असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या गोळा करून कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली. कर्जमाफीची अंमलबजावणी नीटपणे करायची आहे. यापूर्वी कर्जमाफी देताना झालेला गैरप्रकार यावेळी होऊ  नये यासाठी खबरदारी घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Web Title: nagpur vidarbha news chief minister welcome on airport