महाविद्यालये देणार द्विलक्षी प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

ऑनलाइन अर्जात द्यावे लागणार सायन्स ऑप्शन
नागपूर - केंद्रीय प्रवेश समितीमार्फत ऑनलाइन अकरावी प्रवेशातील फसव्या प्रणालीमुळे द्विलक्षी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्‍यात असल्याचे दिसून येत आहे. द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत प्रवेश समितीचे कुठलेही स्पष्ट निर्देश नाहीत. प्रवेशाचा अधिकार महाविद्यालयांना राहणार आहे. त्यामुळे या शाखेत प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्याला द्विलक्षीमध्ये प्रवेश मिळेल की नाही याची पुरेशी स्पष्टता नाही. प्रवेश न मिळाल्यास ऐन वेळी विद्यार्थ्यांना सामान्य विज्ञानामध्ये प्रवेश घ्यावा लागेल.

अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये खासगी महाविद्यालये व मोठ्या शिकवणी वर्गाचे मालक अकरावी प्रवेश प्रक्रियेची सूत्रे पडद्यामागून चालवित असल्याने ही प्रवेश प्रक्रिया भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडली असल्याचा आक्षेप घेतला जात आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज करताना त्यांना कला, वाणिज्य, सामान्य विज्ञान व द्विलक्षी शाखा अशा प्रकारे प्रवेशाचे पर्याय देणे आवश्‍यक आहे. मात्र, प्रवेश प्रद्धतीमध्ये द्विलक्षी शाखेचा कुठेही समावेश नाही. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला जाणारे अनेक विद्यार्थी द्विलक्षी अभ्यासक्रमाची निवड करतात. मात्र, ऑनलाइन अर्जात केवळ कला, वाणिज्य आणि सामान्य विज्ञान एवढेच पर्याय आहेत. 

द्विलक्षी प्रवेशाच्या ७५ टक्के जागांवर प्रवेश देण्याचा अधिकार कनिष्ठ महाविद्यालयांना दिला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जर एखाद्या विद्यार्थ्याने द्विलक्षीला प्रवेश घेण्यासाठी अकरावी सामान्य विज्ञानाचा पर्याय निवडला असता, त्याला संबंधित महाविद्यालयात द्विलक्षीचे प्रवेश संपल्यास  पर्यायी सामान्य विज्ञानाचीच निवड करावी लागेल. वैद्यकीय अभ्यासक्रमाला जाणारे विद्यार्थी हे द्विलक्षीमध्ये ‘फिशरी’ अभ्यासक्रम निवडतात. तर अभियांत्रिला जाण्यासाठी विद्यार्थी हे ‘इलेक्‍ट्रॉनिक्‍स’ची निवड करतात. मात्र, द्विलक्षी प्रवेशामध्ये निर्माण झालेल्या संभ्रमामुळे विद्यार्थ्यांचा प्रवेश मुकतो की काय? अशी भीती पालक आणि विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. 

जागा गुणवत्तेनुसार भरणार 
यासंदर्भात सहायक संचालक डॉ. शिवलिंग पटवे यांना विचारणा केली असता, त्यांनी अर्जात विज्ञान शाखा असेच नमूद करावे लागणार असल्याचे सांगून केवळ महाविद्यालयात असलेल्या जागा गुणवत्तेनुसार भरल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले. तो अधिकार महाविद्यालयांना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुणे, मुंबईत अशाचप्रकारे प्रवेश दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: nagpur vidarbha news Colleges enrolling double-decker entrance