पॉस मशीन वापरा, अधिक कमिशन मिळवा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

नागपूर - केंद्र आणि राज्य सरकार डिजिटल इंडियाच्या दिशेने पावले उचलत असताना आता पॉस मशीन वापरणाऱ्या शिधापत्रिका दुकानदारांना अधिक कमिशन देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने धान्य वाटप करणाऱ्या दुकानदारांना जुन्या दराप्रमाणेच कमिशन मिळणार आहे.

शिधापत्रिका दुकानदार कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करीत आहे. त्यानुसार कमिशन वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला. कमिशन वाढविण्यासाठी अट घातल्याने आता शिधापत्रिका दुकानदारांना पॉश मशीनच्या सहाय्याने व्यवहार करावे लागणार आहे. शहरात ६६४ शिधापत्रिका दुकाने असून, सुमारे २ लाख ७६ हजार कार्डधारक आहेत.

यापूर्वी दुकानदारांना क्विंटलमागे ७० रुपये कमिशन मिळत होते. यात आता दुप्पटीने वाढ होऊन प्रतिक्विंटल १५० रुपये इतका लाभ मिळणार आहे. शहरात जवळपास नव्वद टक्‍क्‍यांहून अधिक दुकानदारांनी पॉस यंत्रणा कार्यान्वित केली असून, त्यांना वाढीव कमिशनचा लाभ मिळणार आहे. हा लाभ ७० रुपये क्विंटलमागे, तर ८० रुपये पॉस मशीनच्या माध्यमातून मिळणार आहे.

साखर महाग
केंद्र सरकारने साखरेवरील अनुदान बंद केल्याने तीन महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानांमध्ये दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांना साखर देणे बंद केले आहे. त्यामुळे आता फक्त अंत्योदय योजनेतील अतिगरीब कुटुंबानाच एक किलो साखर दिली जात आहे. मात्र, आता अंत्योदय कुटुंबांची  साखरही महागली आहे. त्यामुळे त्यांना आता प्रतिकिलो १३.५० पैशांऐवजी २० रुपये मोजावे लागत आहे. खुल्या बाजारात सध्या साखरेचे दर ४१ ते ४५ रुपये प्रतिकिलो आहेत. त्याच  प्रमाणे साखरेच्या प्रमाणातही कपात केली आहे. यापूर्वी दरमहा प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅम साखर मिळत होती. आता एका कुटुंबाला फक्त एक किलो साखर मिळणार आहे.

Web Title: nagpur vidarbha news commission by poss machine use