भूमाफियांविरुद्ध तक्रारींचा पाऊस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

९०१ पैकी ग्वालवंशीविरुद्ध ३१० तक्रारी - एसआयटीची घोडदौड 

नागपूर - विशेष तपास पथकाने दिलीप आणि हरीश ग्वालवंशी या भूमाफियांविरुद्ध कारवाईचा धडाका लावल्यानंतर शहरातील इतरही भूमाफियांविरुद्ध तक्रारींचा पाऊस पडू लागला आहे. आतापर्यंत ९०१ तक्रारी पोलिसांना मिळाल्या असून, ३१० तक्रारी ग्वालवंशीविरुद्ध  आहेत. 

विदर्भातील सर्वांत मोठा भूमाफिया म्हणून या ग्वालवंशी कुटुंबीयांचे नाव आघाडीवर आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत खंडणीबाज भूमाफिया दिलीप आणि हरीश ग्वालवंशीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अन्य भूमाफिया पोलिसांच्या रडारावर आहेत. 

शहरात जमिनीसाठी खंडणी, जमीन हडपण्याचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम्‌ यांनी २७ एप्रिलला सहायक पोलिस आयुक्‍त सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापना केली. वाघचौरे यांनी भूमाफियांविरूद्ध कंबर कसली. त्यांनी शहरातील अनेक ठिकाणी स्वतः भेटी दिल्या आणि भूमाफियांच्या ताब्यात असणाऱ्या जमिनीची पाहणी केली होती. त्यांनी सर्वप्रथम कुख्यात गुंड आणि भूमाफिया दिलीप ग्वालवंशीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यामुळे अन्य भूमाफियांचे धाबे दणाणले होते. 

सहाय्यक पोलिस आयुक्तांनी सामान्य जनतेला विश्‍वासात घेऊन भूखंड परत मिळवून देण्याचे केवळ आश्‍वासनच नव्हे तर विश्‍वास दिला. त्यामुळे आतापर्यंत दिलीप ग्वालवंशी, हरीश ग्वालवंशी आणि गंगाप्रसाद ग्वालवंशी आणि अन्य काही ग्वालवंशी कुटुंबीयांविरुद्ध गुन्हे दाखल केलेत. परिणामी, ज्यांचे भूखंड हडपल्या गेलेत, त्यांची हिंमत आणि पोलिसांवरील विश्‍वास वाढला. गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेले हरीश आणि दिलीप ग्वालवंशी मध्यवर्ती कारागृहात गजाआड आहेत. 

ग्वालवंशी सोडून अन्य भूमाफियांविरुद्ध आतापर्यंत ५९१ तक्रारी एसआयटीला प्राप्त झाल्या आहेत. सोसायटीचे सदस्य म्हणून ५५० तक्रारी अर्ज तर वैयक्‍तिक अर्जदार म्हणून ४५० अर्ज एसआयटीला प्राप्त झाले आहेत. 

ग्वालवंशीसह ३४ माफियांना अटक
जमीन हडपल्याप्रकरणी एसआयटीने आतापर्यंत २५ गुन्हे दाखल केले. यामध्य दिलीप ग्वालवंशी, हरीश ग्वालवंशी यांच्यासह शहरातील प्रमुख ३४ भूमाफियांचा समावेश आहे. आतापर्यंत ४२५ तक्रारदारांना भूमाफियांनी बळकावलेले भूखंड मिळवून दिले. ६०० तक्रारदारांना महिनाभरात भूखंड मिळवून देणार आहेत.

भूखंड बळकावणे किंवा फसवणूक करणाऱ्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी एसआयटीची  स्थापना केली. ज्याचे भूखंड बळकावले असतील त्यांनी कोणतीही भीती न बाळगता एसआयटीकडे तक्रारी कराव्यात. पोलिस तक्रारदारांच्या पाठीशी आहेत. प्रत्येक तक्रारीवर  गांभीर्याने विचार करून समस्या सोडविण्यात येईल. 
- सोमनाथ वाघचौरे, एसआयटी प्रमुख-सहायक पोलिस आयुक्‍त

Web Title: nagpur vidarbha news complaint on land mafia