तानाजी वनवेंच्या समर्थक नगरसेवकांमध्ये पुन्हा फूट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

नागपूर - आपल्याकडे २८ नगरसेवक असल्याचा दावा करणाऱ्या महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते तानाजी वनवे यांच्या समर्थकांमध्ये पुन्हा फूट पडली आहे. किशोर जिचकार यांच्या विजयाच्या गुरुवारी रात्री सी. पी. क्‍लबमध्ये आयोजित केलेल्या पार्टीवर प्रामुख्याने उत्तर नागपुरातील संदीप सहारे यांच्यासह चार नगरसेवकांनी बहिष्कार टाकला.

नागपूर - आपल्याकडे २८ नगरसेवक असल्याचा दावा करणाऱ्या महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते तानाजी वनवे यांच्या समर्थकांमध्ये पुन्हा फूट पडली आहे. किशोर जिचकार यांच्या विजयाच्या गुरुवारी रात्री सी. पी. क्‍लबमध्ये आयोजित केलेल्या पार्टीवर प्रामुख्याने उत्तर नागपुरातील संदीप सहारे यांच्यासह चार नगरसेवकांनी बहिष्कार टाकला.

संजय महाकाळकर यांची याचिका फेटाळून लावल्यानंतर तानाजी वनवे यांनी पेढे वाटले होते. काँग्रेसमधील सर्व वाद संपले असून, काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या आता २९ असल्याचे जाहीर केले होते. सर्वांना सोबत घेऊन आम्ही विरोधी पक्षाची बाजू जोमाने मांडू तसेच एकाही नगरसेवकाला नाराज करणार नाही, असेही वनवे यांनी जाहीर केले होते. तत्पूर्वी, गटनेत्याची निवड आणि स्वीकृत सदस्याच्या नावावर चर्चा करताना विश्‍वासात घेतले जात नाही, बैठकांना बोलावले जात नाही, मंजुरी गृहीत धरल्याचा आरोप संदीप सहारे यांनी केला होता. यामुळे काँग्रेसमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. तानाजी वनवे यांनी स्वतः संदीप सहारे यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढली होती. माजी मंत्री नितीन राऊत यांनी फोनवर चर्चा करून सहारे यांची नाराजी दूर केली होती. यापुढे विश्‍वासात घेतले जाईल, असा शब्दही त्यांना दिला होता. 

तानाजी वनवेंच्या समर्थक नगरसेवकांमध्ये पुन्हा फूट
यानंतर सर्वकाळी सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. गुरुवारी स्वीकृत सदस्यासाठी दावा करणारी विकास ठाकरे यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावताच पुन्हा एकदा सहारे यांनी नाराजीचे अस्त्र उगारले. विजयाच्या पार्टीसाठी सीपी क्‍लबमध्ये आमंत्रित केले होते. मात्र त्यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करून येण्यास नकार दिला. त्यांच्यासोबत नगरसेवक परसराम मानवटकर, दिनेश यादव, स्नेहा निकोसे यांचाही समावेश होता. 

असा नेता काय कामाचा...
याविषयी संदीप सहारे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बहिष्कार टाकल्याचे सांगितले. गटनेता म्हणून तानाजी वनवे यांनी स्वतःच्या अडीच कोटी रुपयांच्या फायली मंजूर करून घेतल्या. मात्र आम्हाला विकास निधी मिळाला नाही. निधी संपल्यावर स्थायी समिती अध्यक्षांकडे सोबत नेले. याचा काहीच फायदा झाला नाही. फक्त स्वतःचे बघणारा गटनेता काय कामाचा? यापेक्षा वेगळे बसू. आपण आपली नाराजी त्यांना स्पष्ट शब्दांत कळविली आहे. नितीन राऊत यांनाही सांगितले. उद्या शुक्रवारी होणाऱ्या महापालिकेच्या सभेतही आपण आपली नाराजी दर्शवणार असल्याचे संदीप सहारे यांनी सांगितले.

Web Title: nagpur vidarbha news confussion in corporator