पाषाणातील काव्याला ‘कार्पोरेट लुक’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

नागपूर - ‘शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’ हा वाक्‌प्रचार आपल्याकडे प्रचलित आहे. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या सुरेख आणि ऐतिहासिक इमारतीला  आलेल्या कार्पोरेट लुकमुळे या कोर्टाची पायरी वारंवार चढण्याचा मोह कुणालाही आवरता येणार नाही. पाषाणातील काव्य असा उल्लेख असलेल्या या वास्तूच्या अंतर्गत रचनेमध्ये बदल केल्यामुळे एखाद्या कार्पोरेट समूहाच्या कार्यालयात प्रवेश केल्याचा अनुभव हायकोर्टाच्या  पहिल्या पायरीपासून येऊ शकतो.

हायकोर्ट बार असोसिएशनच्या नवनियुक्त कार्यकारिणीने पुढाकार घेत उच्च न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील परिसराला (लॉबी) अत्यंत देखणे स्वरूप प्राप्त करून दिले. तसेच या लॉबीमध्ये संविधानाचे प्रास्ताविक बसविण्यात आले आहे. याचे अनावरण रविवारी (ता. ४) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते झाले. यावेळी न्या. भूषण धर्माधिकारी, न्या. वासंती नाईक, न्या. झका हक, न्या. प्रसन्ना वराळे, न्या. रवी देशपांडे, न्या. इंदिरा जैन, न्या. स्वप्ना जोशी, सहायक सॉलिसिटर जनरल उल्हास औरंगाबादकर, एचसीबीएचे अध्यक्ष ॲड. अनिल किलोर, सचिव प्रफुल्ल खुबाळकर आदी होते. याप्रसंगी पक्षकार प्रतीक्षालय, बार टायपिस्ट, स्टॅम्प व्हेंडर, स्टेशनरी, झेरॉक्‍स, कायद्याची पुस्तके यांच्यासाठी तयार केलेल्या कक्षाचे उद्‌घाटन करण्यात आले. बार असोसिएशनतर्फे चालविल्या जाणाऱ्या कॅंटिनचा चेहरामोहरा बदलविण्यात आला असून, ते तारांकित कॅफेटेरियाप्रमाणे दिसू लागले आहे. उद्‌घाटन सोहळ्यानंतर अवघ्या २५ दिवसांत न्यायालयाचा कायापालट करणाऱ्या पुनित आणि इशा डर्गन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 

वकिलांसाठी कारची सुविधा
बऱ्याच वकिलांना उच्च न्यायालयातून जिल्हा न्यायालयात जावे लागते. त्यांच्यासाठी ॲड. अतुल पांडे यांनी आजोबा केशवराव पांडे यांच्या स्मृत्यर्थ कार सुविधा प्रदान केली आहे. यामुळे वकिलांना सहजरीत्या उच्च न्यायालयातून जिल्हा न्यायालयात जाता येणार आहे. तसेच जिल्हा न्यायालय परिसरात वकिलांना उद्‌भवणारी पार्किंगची समस्या सुटणार आहे.

Web Title: nagpur vidarbha news corporate look to court