पत्नीची आत्महत्या; पतीला कारावास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

नागपूर - पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारा पती दादाराव गजबेला (४९, रा. नरखेड) जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एन. बनकर यांनी सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण करायचा. यामुळे पत्नीने आत्महत्या केल्याचा पतीवर आरोप आहे. ही घटना २९ एप्रिल २०१६ रोजी घडली.

पती बेरोजगार असल्यामुळे पत्नी पुष्पलता मजुरीचे काम करायची. पती दररोज दारू पिऊन भांडायचा. तिचे कामावर असलेल्या पुरुषांशी अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन मारहाण करायचा. याच वस्तीत पुष्पलता यांचा भाऊ युवराज पाटील यांचेदेखील घर आहे. बरेचदा पतीने मारहाण करून घराबाहेर काढल्यावर पुष्पलता भावाकडे राहायच्या.

घटनेच्या दिवशीही आरोपीने सकाळी ७.३० वाजता कौटुंबिक कारणावरून पुष्पलता यांना मारहाण केली. यावेळी मुलगा स्वीटीने थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण केली. यानंतर पत्नीने स्वयंपाकगृहात जाऊन विष घेतले. नरखेड येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्‍टरांनी मेयो हॉस्पिटलला नेण्यास सांगितले. मेयोत आणले असता डॉक्‍टरांनी मृत घोषित केले.

याप्रकरणी मुलगा स्वीटीने दिलेल्या तक्रारीवरून नरखेड पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा नोंदविला. प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेत न्यायालयाने नमूद शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील दीपिका गवळी यांनी बाजू मांडली.

Web Title: nagpur vidarbha news crime