आंदोलनकर्त्यांविरुद्ध गुन्हे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

नागपूर  - अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (ॲट्रॉसिटी) सुधारणांच्या विरोधात सोमवारी पाळलेल्या ‘भारत बंद’वेळी आंदोलन करणाऱ्या शेकडो आंदोलकांवर नागपूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

नागपूर  - अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (ॲट्रॉसिटी) सुधारणांच्या विरोधात सोमवारी पाळलेल्या ‘भारत बंद’वेळी आंदोलन करणाऱ्या शेकडो आंदोलकांवर नागपूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

जरीपटका, पाचपावली, सदर आणि सीताबर्डी पोलिसांनी ही कारवाई केली.
जरीपटका व पाचपावली पोलिसांनी बेकायदा एकत्र येणे, जाळपोळ करणे, बसची तोडफोड करणे आदी गुन्हे दाखल केले. कृष्णा शंकर खोब्रागडे, आशीष सोमकुंवर, अखिलेश ऊर्फ डोमा मधुकर पाटील, जितेंद्र घोडेश्‍वार, परेश जामगळे, शुभम ऊर्फ संदीप, भोला शेंडे, नन्ना सवाईतुल, मयूर पाटील, सतीश पाटील, सुरेश कांबळे, अमित सूर्यवंशी, महेंद्र भांगे, गौरव अंबादे, बबलू तिरपुडे, अक्षय गजभिये, राकेश टेंभूर्णे, ऋषभ मेश्राम, पीयूष काळबांधे, संदीप टेंभूर्णे, अक्षय मेश्राम यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले.

सीताबर्डी पोलिसांनी नागोराव जयकर, अनिल गोंडाणे, किशोर उके, योगेश लांजेवार, महेश सहारे, आनंद सोमकुंवर, क्रिष्णा बेले, गौतम पाटील, रूपेश बागेश्‍वर, नितीन घोडेश्‍वार, माया शेंडे, नितीन फुलमाळी, चंदू बागडे, जयंत शेंडे, अनिल वाघधरे, प्रफुल्ल बाराहाते, उषा मेश्राम, संदीप शेंडे, उद्धव खडसे आणि इतर जवळपास ४०० महिला व पुरुष आंदोलनकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. सदर पोलिसांनी भोला शेंडे व इतरांविरुद्ध बेकायदा रॅली काढणे व कारची तोडफोड करण्याचा गुन्हा दाखल केला.

Web Title: nagpur vidarbha news Crimes against the agitators