स्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

मृतांचा आकडा ३५ वर : सर्वाधिक मृत्यू खासगीत 
नागपूर - रामेश्‍वरी भागातील रहिवासी ४८ वर्षीय व्यक्‍तीचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. भरती झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्वाइन फ्लूचा संशय आल्याने रुग्णाच्या जिभेवरील द्रवाचे नमुने घेण्यात आले. ते मेयोत तपासणीला पाठविले. परंतु अहवाल येण्यापूर्वीच युवकाचा मृत्यू झाला. रुग्णाच्या कुटुंबीयांना स्वाईन फ्लू होण्याची भीतीही व्यक्‍त केली जात आहे. मात्र महापालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे.  

१ जानेवारी ते २१ जून या काळात नागपुरात ३५ जणांचा मृत्यू झाला. पुण्यात हाच आकडा शंभरावर पोहचला आहे. विदर्भात ६० मृत्यू झाल्याची माहिती आहे. यानंतरही उपचार यंत्रणेला जाग आलेली नाही. दरवर्षी आरोग्य विभागाचे अधिकारी स्वाइन फ्लू, हिवताप, डेंगी, गॅस्ट्रो या संसर्गजन्य आजारांवरील नियंत्रण करतात. परंतु स्वाइन फ्लू नियंत्रणासाठी अधिकारी पुढे येत नसल्याचे उदासीन चित्र दिसून येत आहे.  

पूर्व विदर्भात अातापर्यंत ३५ मृत्यू 
पूर्व विदर्भात भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात स्वाइन फ्लू बाधितांची संख्या १२५ वर पोहचली आहे. तसेच पश्‍चिम विदर्भात अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यातही बाधितांची संख्या ७५ च्या घरात आहे. पूर्व विदर्भात सर्वाधिक मृत्यू खासगी रुग्णालयात झालेत. मेडिकलमध्ये अवघे सात मृत्यू झाले. पूर्व विदर्भातील ३५ मृतांमध्ये केवळ ७ जण मेडिकलमध्ये दगावले आहेत. तर उर्वरित २८ मृत्यू शहरातील विविध खासगी रुग्णालयात उपचार झाले होते.

Web Title: nagpur vidarbha news death by swine flu