आमदार डॉ. मानेंचा तोल सुटला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

नागपूर - भाजपच्या वाचाळ लोकप्रतिनिधींमध्ये आता उत्तर नागपुरातील आमदार डॉ. मिलिंद माने यांचाही आज समावेश झाला. आतापर्यंत पोलिस, सामान्य नागरिकांबाबत अपशब्द वापरून स्वतःच्या मानसिकतेचे दर्शन घडविणाऱ्या भाजपच्या लोकप्रतिनिधीनंतर आमदार डॉ. मिलिंद माने थेट प्रसारमाध्यम प्रतिनिधींवरच घसरले. एका वृत्तामुळे विचलित झाल्याने ‘वार्ताहराने माझ्याकडे यावे. मी त्यालाच नापास करतो’, असे त्यांनी आज वक्तव्य केले. 

२०१२ मध्ये नगरसेवकपदाची निवडणूकही जिंकू न शकलेले आमदार डॉ. मिलिंद माने आज लक्ष्मीनगरातील भाजपच्या नगर कार्यकारिणीत भाजपच्या कार्यकर्त्यांना सल्ला देताना बोलत होते. 

एका वर्तमानपत्रात शहरातील सहाही आमदारांच्या कार्याचा लेखाजोखा छापण्यात आला. त्यात तीन आमदार नापास झाल्याचे नमूद आहे, असे आमदार डॉ. माने म्हणाले. भाजपचे तीन आमदार नापास झाल्याचे कुठल्या आधारावर छापले? त्या वार्ताहराने माझ्याकडे यावे. मी त्यालाच नापास करतो, असे वक्तव्य करीत वर्तमानपत्र भाजपच्याच लोकांना लक्ष्य करीत आहे. सरकारवर टीका करीत असल्याचे ते म्हणाले. कदाचित त्या वार्ताहराने आमदार डॉ. माने नापास झाल्याचे छापले असावे, असा अंदाज येथे उपस्थित सर्वच भाजप कार्यकर्ते कार्यक्रमादरम्यान लावत होते.

पत्रकारांनी व्‍यक्‍त केली नाराजी
या वेळी पत्रकारांसोबत असलेल्या एका भाजप पदाधिकाऱ्याने तर परिश्रमाने आमदार म्हणून निवडून आले नसले की, त्या पदाची किंमतही कळत नाही. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. माने असल्याचा टोला हाणला. त्यांच्या या वक्तव्यावर कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यास आलेल्या सर्वच पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली. त्याच वेळी काहींनी डॉक्‍टर आज खऱ्या अर्थाने भाजपचे आमदार झाल्याचे ताशेरेही ओढले.

Web Title: nagpur vidarbha news dr. milind mane talking