रंगकर्मींचे तालमीपेक्षा परीक्षकांवरच लक्ष!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

नागपूर - आपल्या नाटकाची तालीम करण्यापेक्षा परीक्षक कोण असणार, याचा शोध घेत बसण्याची एक अजब परंपरा आहे. विशेषत्वाने राज्य नाट्य स्पर्धेत या परंपरेचे पायिक सक्रिय होत असतात आणि सध्या त्यांची चाचपणी सुरू झालेली आहे. परीक्षक कुठले आहेत, कुणाच्या परिचयातील आहेत, आपलं काही जमू शकेल का, या सर्वांचा विचार करण्यात आणि त्यासाठी प्रयत्न करण्यात अनेकांची एनर्जी सध्या खर्ची होत आहे. 

राज्य नाट्य स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले की, विशिष्ट रंगकर्मी परीक्षकांची नावे जाणून घेण्यात ‘इंटरेस्टेड’ असतात. स्पर्धेदरम्यान परीक्षकांच्या भेटीसाठी प्रयत्न करायचे आणि कसेबसे आपल्या नाटकाच्या बाजूने निकाल लावण्यासाठी भाग पाडायचे, असा प्रकार होत असल्याचा आरोप काही वर्षांपूर्वी सातत्याने करण्यात आला. त्याच कारणांनी परीक्षकांना भेटणाऱ्या रंगकर्मींवर वॉच ठेवण्याकरिता सरकारला खास यंत्रणा उभी करावी लागली होती. त्यावर्षी तसा काही प्रकार झाला नाही, असा दावाही करण्यात आला.

परीक्षकांनी कितीही तटस्थपणे निकाल दिला, तरी त्या निकालावर हरकत घेण्याचे प्रमाण मात्र अनेक वर्षांमध्ये कमी झालेले नाही. एखाद्या स्पर्धेदरम्यान परीक्षकांनी निकालात घोळ घातला असेलही; पण त्याचे पुरावे नाहीत किंवा लेखी तक्रारही नाही. केवळ आरडाओरड करणे आणि आक्षेप नोंदवणे, एवढेच झाले. मुख्य म्हणजे आपल्या नाटकाची तयारी सोडून परीक्षकांच्या मागे लागण्यात अनुभवी किंवा नवोदित, असा भेद रंगकर्मींमध्ये मुळीच नाही. सारेच तरबेज झालेले आहेत. पण, ते सरसकट नसून विशिष्ट लोकच आहेत, हेही अधिक महत्त्वाचे आहे. राज्यभर परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या एका अनुभवी महिला रंगकर्मीने मधल्या काळात आपले अनुभवही शेअर केले होते. स्पर्धेपूर्वी आणि निकालानंतर रंगकर्मी फोन करून कुठल्या भाषेत बोलतात, याचे तिने केंद्रांसह दाखले दिले होते. मात्र, केवळ विशिष्ट रंगकर्मींमुळे त्या त्या शहरांची बदनामी होऊ नये, याचा विचार करून हा विषय माध्यमांमध्ये चर्चेला आला नाही. पण, याही वर्षी स्पर्धेपूर्वी, दरम्यान किंवा निकालानंतर असाच प्रकार सुरू राहिला, तर रंगकर्मींच्या नावांसह परीक्षकांकडून एखादी तक्रार येऊ शकते, हे नक्की.

Web Title: nagpur vidarbha news drama competition