नालेसफाईचाही नद्यांप्रमाणे इव्हेंट करा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

नागपूर - पहिल्याच मॉन्सूनने स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शहरातील महापालिका प्रशासनाने कामांचे पितळ उघडे पाडले. मंगळवारी फक्त अडीच ते साडेतीन तास पाऊस कोसळला. असे असताना अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. रस्ते तुंडुब भरले, नदी-नाल्यांना पूर आला. यामुळे महापालिकेने पावसाळापूर्व कामे थातूरमातूर आणि कागदोपत्रीच केल्याचे दिसून आले.

नागपूर - पहिल्याच मॉन्सूनने स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शहरातील महापालिका प्रशासनाने कामांचे पितळ उघडे पाडले. मंगळवारी फक्त अडीच ते साडेतीन तास पाऊस कोसळला. असे असताना अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. रस्ते तुंडुब भरले, नदी-नाल्यांना पूर आला. यामुळे महापालिकेने पावसाळापूर्व कामे थातूरमातूर आणि कागदोपत्रीच केल्याचे दिसून आले.

लिकेने नदी स्वच्छतेचा इव्हेंट केला आहे. त्यामुळे सर्व लक्ष नागनदी आणि पिवळ्या नदीच्या स्वच्छतेवर देण्यात आले. अनेक स्वयंसेवी संस्था नदी स्वच्छता अभियानात सहभागी झाल्या. फारमोठे समाजकार्य केल्याचे दर्शवून स्वतःचे हात धुवून घेतले. फोटो छापून घेतले. मात्र, पहिल्याच पावसाने फक्त नद्याच नव्हे तर आता नाल्या, विशेषतः रस्त्यांलगच्या सांडपाण्याच्या नाल्याही स्वच्छतेचेही गरज असल्याचे दाखवून दिले.

महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना प्रसिद्धीची भारी हौस असेल, तर आता नाल्या स्वच्छतेचाही इव्हेंट करावा, अशी संतप्त नागरिकांकडून होत आहे. 

कालपर्यंत आयुक्त चंद्रशेखर यांच्या कार्यकाळात झालेल्या आयआरडीपीच्या रस्त्यांना दोष दिला जात होता. या रस्त्यांवर सांडपाण्याच्या नाल्या सदोष बांधल्या. बांधकाम मध्येच सोडून देण्यात आले. त्यातील काँक्रिट काढण्यात आले नाही. पाणी शेवटपर्यंत वाहून जाईल, अशी व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे शहरात पाणी जमा होते असे सांगितल्या जात होते. मात्र, हे रस्ते तयार करून आता सुमारे १५ वर्षांचा कार्यकाळ उलटला. मात्र, दीड दशकात महापालिकेने त्यात कुठलीच सुधारणा केली नाही. याउलट दिसेल त्या रस्त्यांना काँक्रिटीकरणाचा सपाटा लावला. या रस्त्यांवरही सांडपाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. रस्ते तुलनेत प्रचंड उंच करण्यात आले.

यामुळे घरे खोलगट झाली आहेत. पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने ते आता  थेट घरांमध्ये शिरत आहे.

छत्रपती भुयारी मार्गाची समस्या केव्हा सुटणार
सदोष बांधकामाचा उत्तम नमुना म्हणजे छत्रपती चौकातील भुयारी मार्ग आहे. पश्‍चिम, दक्षिण आणि उत्तर या तीन दिशेने भुयारी मार्गाकडे झपाट्याने पाणी येते. याच भागात उतार आणि नाला आहे. त्यामुळे थोडातरी पाऊस पडला तरी भुयारी मार्ग तुडुंब भरतो. कार, दुचाकीवरून  पाणी जाते. तासन्‌तास वाहतूक ठप्प होते. दरवर्षी हा प्रकार होतो. असे असताना त्यात कुठलीच  सुधारणा केली जात नाही. 

म्हणे कायमस्वरूपी व्यवस्था करणार
पहिल्या पावसात अनेक वस्त्या पाण्यात बुडल्यानं महापौर नंदा जिचकार, आयुक्त अश्‍विन मुद्‌गल, सत्तापक्षनेते संदीप जोशी यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यापुढे पाणी साचणार नाही, याची खबरदारी घेऊन महापौरांनी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. मात्र, उंच झालेले सिमेंट, खोलात गेलेल्या वस्त्या, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नसलेल्या नाल्यांची समस्या कशी दूर करणार, असा प्रश्‍न उपस्थित होतो. अद्याप अनेक सिमेंटचे रस्ते अपूर्ण आहेत. ते पूर्ण झाल्यावर घरांमध्ये पाणी शिरण्याची समस्या आणखीच वाढणार आहे.

Web Title: nagpur vidarbha news dranage block in rain