नागपूर ड्रग्ज तस्करीचा अड्डा

अनिल कांबळे
मंगळवार, 25 जुलै 2017

सात महिन्यांत ५८ लाखांचे अमली पदार्थ जप्त - ६६ तस्करांना अटक

नागपूर - गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या सात महिन्यांत ५८ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले. यात ४५ लाखांच्या गांजाचा समावेश आहे. एकूण ६६ आरोपींना अटक केली. यावरून नागपूर शहर अंमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे केंद्र झाल्याचे दिसून येते. 

सात महिन्यांत ५८ लाखांचे अमली पदार्थ जप्त - ६६ तस्करांना अटक

नागपूर - गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या सात महिन्यांत ५८ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले. यात ४५ लाखांच्या गांजाचा समावेश आहे. एकूण ६६ आरोपींना अटक केली. यावरून नागपूर शहर अंमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे केंद्र झाल्याचे दिसून येते. 

युवा पिढी अमली पदार्थाच्या आहारी जाण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. पब संस्कृती रुजू होत चालल्यामुळे उपराजधानीत अनेक मोठमोठे हॉटेलमध्ये युवक आणि युवती मोठ्या प्रमाणात ड्रग्स आणि अन्य अमली पदार्थ सेवन करतात. पाश्‍चिमात्त्य संस्कृतीचे अनुकरण करीत तरुण आणि तरुणी मोठ्या प्रमाणात मद्य आणि अमली पदार्थाचे सेवन करीत आहेत. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सर्वाधिक आकडा आहे. महाराष्ट्रातील अमली पदार्थाचे केंद्रस्थान म्हणून उपराजधानीची ओळख आहे. राज्यात कुठेही अमली पदार्थाची तस्करी करायची असल्याचे नागपूरमधूनच ‘डीलिंग’ करावे लागते, हे सत्य आहे. पोलिसांनी अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या ६६ आरोपींना अटक केली आहे. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वांत मोठी कारवाई गुन्हे शाखेने केली आहे, हे विशेष.

गांजा आणि ड्रग्ज तस्कर नागपूर शहरातूनच संपूर्ण राज्यभरात अमली पदार्थ पोहचवितात. यासाठी मोठे नेटवर्क राज्यभरात काम करते. या नेटवर्कला उद्‌ध्वस्त करण्यासाठी पोलिस निरीक्षक आर. डी. निकम यांच्या नेतृत्वातील अंमली पदार्थ विरोधी विभाग अहोरात्र कार्य करते. शहरात येणारे ड्रग्स तस्कर हे दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बिहार, उत्तरप्रदेश येथील आहेत.

गांजाची तस्करी मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश या राज्यांतून महाराष्ट्रात होते. राज्यात सर्वाधिक गांजाची तस्करी नागपुरात केली जाते. यासाठी रेल्वे, बस आणि ट्रकचा वापर गांजा तस्कर करतात. १ जानेवारी ते जुलैपर्यंत गांजाची तस्करी होत असलेल्या २५ ठिकाणी छापे घालण्यात आले. २६५ किलो गांजा आणि अन्य मुद्देमाल (किंमत ४५ लाख रुपये) जप्त करण्यात आला तर ४२ तस्करांना अटक करण्यात आली. त्यानंतर सव्वा किलो चरस (किंमत ५ लाख ४ हजार) आणि कोकेन ९६ ग्रॅम (६ लाख २५ हजार) जप्त करण्यात आली. तसेच गर्द पावडर, भांग आणि अन्य अमली पदार्थही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले. या छाप्यात ६६ ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली.

मद्य आणि ड्रग्जचे सेवन करण्यात १६ ते ३० वर्षे वयोगटातील युवक आणि युवतींचा समावेश आहे. यामध्येही व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांमध्ये फॅशन म्हणून ड्रग्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक विद्यार्थिनी केवळ उत्सुकतेपोटी ड्रग्ज घेतात आणि नंतर नकळत ते ‘ड्रग्ज ॲडिक्‍ट’ बनतात. युवकांमध्ये चरस, कोकेन, हेरॉइन या अमली पदार्थाचे व्यसन आहे. विद्यार्थी दशेत अमली पदार्थाचे सेवन ही पालकांसाठी चिंतनीय बाब आहे.

Web Title: nagpur vidarbha news drugs smuggling place