अर्थव्यवस्था रुळावर - आमदार व्यास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

नागपूर - नोटाबंदीमुळे बिघडलेली अर्थव्यवस्था रुळावर आली. तसेच संपूर्ण  व्यवस्थेमध्ये नवीन उत्साह संचारला आहे. मुख्य म्हणजे हा निर्णय भारतीयांनी स्वीकारला असल्याचे आमदार गिरीश व्यास म्हणाले.

नोटाबंदीच्या निर्णयाला वर्षपूर्ती झाल्यानिमित्त भाजपतर्फे संपूर्ण शहरात विधानसभा मतदारसंघनिहाय जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नोटाबंदीचा निर्णय, तीन वर्षांत भाजप सरकारने घेतलेले चांगले निर्णय, जनतेने असलेले चैतन्य आदींवर प्रकाश टाकण्यात आला. 

भारत माता चौक येथे आयोजित कार्यक्रमात आमदार व्यास बोलत होते. याशिवाय  पश्‍चिम मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात खासदार अजय संचेती म्हणाले, काँग्रेसने कुणावरही टीका करण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. 

गेल्या ६५ वर्षांमध्ये काँग्रेसने केलेली लूट  पाहता त्यांनी अन्य सरकारवर टीका करणे चुकीचे असल्याचे संचेती म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत  झाल्याचे संचेती म्हणाले. 

कार्यक्रमाला उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव, जयप्रकाश गुप्ता, भूषण सिंगणे, अर्चना देहनकर, बंडू राऊत, विलास त्रिवेदी, किशोर पलांदूरकर, अब्दुल कादीर, अशफाक पटेल, वंदना यंगटवार, राजेश घोडपागे, बाळू बांते, श्‍याम चांदेकर, राहुल खंगार, दीपांशू लिंगायत, दशरथ मस्के, अशोक नायक, सरला नायक, प्रमोद दहीकर, संजय महाजन, सचिन राठोड, गोपाल बनकर, सुमेधा देशपांडे, शकुंतला पारवे, आशीष पारधी, सतीश वडे होते.

Web Title: nagpur vidarbha news economy