काँग्रेसला आणखी झटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

माजी नगरसेवक डॉ. प्रशांत चोपडा भाजपमध्‍ये

नागपूर - काँग्रेसचे माजी नगरसेवक डॉ. प्रशांत चोपडा यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. विशेष म्हणजे डॉ. चोपडा यांच्या पत्नी काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. पक्षांतरबंदी कायद्यामुळे त्या काँग्रेसमध्येच राहणार आहेत. 

माजी नगरसेवक डॉ. प्रशांत चोपडा भाजपमध्‍ये

नागपूर - काँग्रेसचे माजी नगरसेवक डॉ. प्रशांत चोपडा यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. विशेष म्हणजे डॉ. चोपडा यांच्या पत्नी काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. पक्षांतरबंदी कायद्यामुळे त्या काँग्रेसमध्येच राहणार आहेत. 

सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत वाड्यावर डॉ. चोपडा यांचा प्रवेश  समारंभ झाला. त्यांच्यासोबत संजय मोहोड, डॉ. रणदिवे हे काँग्रेसचे कार्यकर्तेसुद्धा भाजपमध्ये दाखल झालेत. याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, आमदार सुधाकर  देशमुख, आमदार गिरीश व्यास, आमदार विकास कुंभारे आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित  होते. पश्‍चिम नागपूरमध्ये डॉ. चोपडा यांचा दांडगा जनसंपर्क आहे. ते स्वतः सदर परिसरातून महापालिकेच्या निवडणुकीत दोनवेळा निवडून आले होते. यावर्षी आरक्षणामुळे त्यांची पत्नी डॉ. गार्गी चोपडा यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. प्रभागात काँग्रेसच्या तीनही उमेदवारांपेक्षा गार्गी चोपडा यांनी सर्वाधिक मते घेतली आहेत. 

महापालिकेच्या निवडणुकीत संपूर्ण शहरात काँग्रेसची दाणादाण झाली असताना चोपडा यांच्या प्रभागात चारही काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. यात डॉ. चोपडा यांच्या जनसंपर्काचा सर्वाधिक वाटा आहे. 

चोपडांचे धक्कातंत्र 
महापालिकेच्या निकालानंतर मतांच्या आघाडीवरून डॉ. प्रशांत चोपडा आणि नगरसेवक हरीश ग्वालवंशी यांच्यात चांगलाच वाद झाला होता. यामुळे नगरसेविका गार्गी चोपडा यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. फक्त २९ सदस्य असलेल्या काँग्रेसमध्ये त्यांच्या राजीनाम्याने चांगलाच धक्का बसला होता. याशिवाय महापालिकेतील स्वीकृत सदस्य मिळणार नसल्याने सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घातली. राजीनामा परत घेण्यास लावले.  महापालिकेत गटनेतेपदाचा वाद निर्माण झाल्यानंतर डॉ. चोपडा यांनी ठाकरे गटातून वनवे गटात उडी घेऊन सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला होता. आता भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी दोन्ही गटांना जबर धक्का दिला आहे.

Web Title: nagpur vidarbha news ex. corporator dr. prashant chopada entry in bjp