रेशीमबागवरील जत्रा, प्रदर्शनांचा नासुप्र करणार फेरविचार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

नागपूर - ‘सकाळ’ने प्रकाशित केलेल्या ‘प्रदर्शनांनी मारले खेळाचे मैदान’ या वृत्ताची दखल घेऊन नागपूर सुधार प्रन्यासने आठ कार्यक्रमांना दिलेल्या परवानग्या आणि व्यावसायिक कार्यक्रमांना मैदान भाड्याने देण्याच्या धोरणाचा फेरविचार करण्याचा निर्णय घेतला. पुढील विश्‍वस्त मंडळाच्या बैठकीत हा विषय प्राधान्याने घेणार असल्याचे प्रन्यासने ‘सकाळ’ला लेखी कळविले.

नागपूर सुधार प्रन्यासच्या मालकीच्या रेशीमबाग मैदानात एकूण तीन भूखंड आहेत. विविध व्यक्ती, संस्थांनी मागणी केल्यास कमित कमी १० दिवसांसाठी प्रदर्शने, प्रासंगिक सोहळे, करमणूक तसेच धार्मिक कार्यक्रमासाठी ते भाड्याने दिले जाते. राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाच्या शासन निर्णयानुसारच मोकळी जागा विविध कार्यक्रमांसाठी दिली जाते. या धोरणानुसार सुधार प्रन्यासच्या वतीने रेशीमबाग मैदान कार्यक्रमांसाठी दिले जाते. नासुप्रतर्फे एकूण आठ विविध कार्यक्रमांना ११ जानेवारी २०१८ पर्यंत परवानगी दिली आहे. सुधार प्रन्यासच्या विश्‍वस्त मंडळाची पुढील बैठक रेशीमबाग मैदान भाड्याने देण्याचा धोरणाचा फेरविचार केला जाईल, असेही सुधार प्रन्यासने कळविले.

Web Title: nagpur vidarbha news exhibition by sakal