कृषी विभाग म्हणतो, मृत्यूसाठी शेतकरीच जबाबदार!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

नागपूर - कीटकनाशक फवारणी करताना योग्य दक्षता न घेतल्याने मृत्यू होत असल्याचे स्पष्टीकरण देत कृषी विभागाने यासाठी शेतकऱ्यांनाच जबाबदार ठरविले आहे. यातून  कीटकनाशक कंपन्यांना एकप्रकारे क्‍लीन चिटच देण्याचा घाट घातल्याचे दिसते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कीटकनाशक कंपनी आणि अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर विभागाकडून शेतकऱ्यांनाच जबाबदार ठरविण्यात आल्याने त्यांच्या आरोपाला बळ मिळाल्याची चर्चा आहे. 

पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विदर्भात २२ पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. 

त्यात नागपूर जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे. बोगस कीटकनाशकांमुळे हे मृत्यू होत असल्याचे बोलले जात असताना या प्रकरणाच्या चौकशीसाठी शासनाकडून एक समितीही गठित करण्यात आली आहे. 

मात्र, कृषी विभाग आधीच कीटकनाशक कंपन्यांना क्‍लीन चिट देण्यासाठी सरसावला आहे. जिल्हा परिषदेचा कृषी विभाग आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांनी एक प्रसिद्धिपत्रक काढले आहे. 

यात मृत्यूसाठी शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा कीटकनाशकाची जास्त मात्रा वापरणे, पीकनिहाय शिफारस केलेल्या कीटकनाशकांवरील असलेल्या लेबलनुसार वापर न करणे, विविध कीटकनाशकांचे मिश्रण करून फवारणी करताना त्यांची एकमेकांशी सुसंगती लक्षात न घेता फवारणी करणे, फवारणी करताना खानपानाच्या सवयीकडे दक्षता न घेणे, मिस्ट ब्लोअरसारख्या फवारा उत्पन्न करणारे पॉवर स्प्रेअरचा वापर करताना सुरक्षेच्या उपाययोजनांचा अवलंब न करण्याचे म्हटले आहे. त्यामुळे एकप्रकारे विभागाकडून मृत्यूसाठी फवारणी करणाऱ्यांच जबाबदार ठरविल्याचे दिसत आहे.

४७ विक्री केंद्रे बंद
कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकात खरीप हंगामात १११५ विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली असून ४७ केंद्रे बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: nagpur vidarbha news farmer death