परवान्याअभावी फटाका बाजार थंड

परवान्याअभावी फटाका बाजार थंड

नागपूर - दिवाळीसाठी घाऊक फटाक्‍यांची बाजारपेठ सज्ज झाली असली तरी अद्याप जिल्हा प्रशासनाने फटाक्‍यांच्या अस्थायी परवानाधारकांना परवाने दिलेले नाहीत. त्यामुळे खरेदीला अल्प प्रतिसाद आहे. मागील वर्षाच्या तुलनेत पंधरा ते वीस टक्‍क्‍यांनी किमती वाढल्याने दरवर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत केवळ ३० टक्के विक्री झाली झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये स्टॉक संपण्याची चिंता वाढली आहे.  

दीपोत्सव आबालवृद्ध सर्वच आनंदात साजरा करीत असतात.  सर्वांनाच या दीपोत्सवाची प्रतीक्षा असते. सर्वांचाच लोकप्रिय असलेला दीपोत्सव अवघ्या दहा दिवसांवर आल्याने या सणासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे.

‘प्रकाशाचा सण’ असा गौरव होणाऱ्या या सणाचे मुख्य आकर्षण म्हणजे फटाके. परंतु, यंदा या फटाक्‍यांवर महागाईचे सावट आहे. नागपूर विदर्भातील फटाक्‍याची मोठी बाजारपेठ आहे. येथील बाजारात जवळपास ६० ते ८० टक्के फटाक्‍यांचा माल हा शिवकाशी येथून येतो. तर, उर्वरित माल मध्य प्रदेश, राजस्थानसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून आणला जातो. बाजारात फटाक्‍यांची होलसेल खरेदी करण्यासाठी विदर्भासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील व्यापारी येत असतात. फटाक्‍यांचे स्टॉलवर कोजागरी पौर्णिमेपासूनच खरेदीसाठी गर्दी होत असते. परंतु, यंदाच्या वर्षी फटाक्‍यांचे भाव हे तब्बल १५ ते २० टक्‍क्‍यांनी वाढल्यामुळे त्याचा परिणाम फटाक्‍यांच्या बाजारावर झाला आहे. यंदा चॉकलेट चक्री, हॉटविल, फोटो फ्लॅश, डिस्को फ्लॅश हे नवीन फटाके बाजारात आलेले आहेत. जीएसटीमुळे फटाक्‍यांवर आकारण्यात येणारा कर (टॅक्‍स) हा १४ टक्‍क्‍यांनी वाढला आहे. याशिवाय पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्यामुळे फटाक्‍यांचा माल वाहतूक खर्च वाढला.  परिणामी किमती वाढल्या आहेत. नागपूर जिल्ह्यात १० कोटी रुपयांचा व्यवसाय होतो. यंदा अस्थायी फटाके विक्रेत्यांना जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मिळाली नसल्याने किरकोळ विक्रेत्यांकडून होणारी फटाक्‍याची मागणीत मंदावली आहे. आता दहा दिवसांवर दिवाळी आलेली असताना अद्यापही बाजारात किरकोळ दुकाने लागली नाहीत. त्याचा फटका शहरातील घाऊक व्यापाऱ्यांना बसू लागला असून व्यवसाय ठप्प झाला असल्याचे परशुराम खारवटकर ॲण्ड सन्स बारुदवालेचे संचालक नामदेव खारवटकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com