पहिल्या ऑप्शनचे २२ हजारांवर प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

अकरावी प्रवेश : विज्ञान, वाणिज्य शाखेत सर्वाधिक; कला, एमसीव्‍हीसीत कमी
नागपूर - अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठीची गुणवत्ता यादी गुरुवारी (ता. २०) संकेतस्थळावर प्रकाशित झाली. त्यानुसार सोमवारपर्यंत दुसऱ्या फेरीतील नोंदणीत पहिले ऑप्शन देणाऱ्या २२ हजारांवर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतले. यात सर्वाधिक विज्ञान शाखेत १२ हजार ४७९ तर वाणिज्य शाखेत १० हजार ८८० प्रवेश झाले. कला आणि एमसीव्हीसी शाखेतील प्रवेशाची संख्या कमी आहे.   

केंद्रीय प्रवेश समितीमार्फत अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेतील पहिली प्रवेश फेरी १४ जुलै रोजी पूर्ण झाली. यात १६ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. पहिल्या पसंतीक्रमानुसार निवड झालेल्या जवळपास २४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. समितीच्या निर्णयानुसार या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत सहभाग घेता आला नाही. मात्र, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अकरावीसाठी अर्जच केला नव्हता, त्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयासाठी अर्ज नोंदणी आणि महाविद्यालयाचे ऑप्शन भरण्याची मुभा दिली होती. त्यानुसार १८ जुलैपर्यंत बहुतांश विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी करून ऑप्शन भरले. त्यानंतर २० जुलैला महाविद्यालयांसाठी नोंदविण्यात आलेल्या पहिल्या ऑप्शननुसार जवळपास २६ हजार विद्यार्थ्यांची यादी पाठविण्यात आली. त्यापैकी जवळपास ६ हजारांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले. दोन्ही फेरीतील पहिल्या ऑप्शनमधील २२ हजार ६११ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतले. 

यात विज्ञान अभ्यासक्रमात १२ हजार ४७९, वाणिज्यसाठी १० हजार ८८०, कला शाखेत २ हजार १६० तर एमसीव्हीसी शाखेत १ हजार ९२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे विज्ञान आणि द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या २३ हजार ९००, वाणिज्यच्या १५ हजार ९८०, कला शाखेत ९ हजार ५०० आणि एमसीव्हीसी शाखेत ३ हजार ८२० अशा ५२ हजार ८४० जागा आहेत. त्यासाठी ३५ हजार ५१६ अर्ज आले. त्यामुळे १७ हजारांवर जागा रिक्‍त राहणार आहेत. 

आजपासून तिसऱ्या फेरीसाठी ‘ऑप्शन’  
तिसऱ्या फेरीची सुरुवात बुधवारपासून (ता.२६) होणार आहे. विद्यार्थ्यांना दोन दिवस ऑप्शन निवडता येईल. दुसऱ्या फेरीत प्रवेश नाकारणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीत पहिले दोन ऑप्शन बाद करून तिसरे ऑप्शन देता येईल. २९ जुलैला या प्रवेशाची यादी महाविद्यालयांकडे पाठविण्यात येईल.

Web Title: nagpur vidarbha news first option 22000 admission