हिरव्या किड्यांमुळे नागपूरकर हैराण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

नागपूर - गाडीवर जाताना सध्या ते छोटे छोटे किडे खूप त्रास देतायत ना... डोळ्यात जाताहेत... डोक्‍यावर केसांमध्ये वळवळ करताहेत... किंवा अगदी कोल्डकॉफीच्या ग्लासवर दिसल्याने ‘ईईई’ असंही होतंय ना! वैताग आणणाऱ्या या छोट्या किड्यांचे आगमन उपराजधानीत झाले आहे. पण, घाबरू नका; ते घातक नाहीत. हवामान पोषक असल्यामुळे... हे कीटक मोठ्या संख्येने दिसत असून, थंडी न वाढल्यास अजून काही दिवस त्यांचा मुक्काम राहणार आहे.
सध्या दिवसभर उकाडा आणि रात्रीपासून पहाटेपर्यंत गारवा असे वातावरण आहे. पूर्णत: थंडीही नाही आणि गर्मीदेखील नसल्यामुळे या हिरव्या रंगाच्या सोपेचे किडे आळढताहेत. 

रात्री पडणाऱ्या हलक्‍याशा थंडीमुळे तापमानात झालेला हा बदल या किड्यांसाठी पोषक असून ते लाखोंच्या संख्येने दिसून येत आहेत. हे कीटक घातक नाहीत किंवा त्यांच्यामुळे मानवी आरोग्यास धोका नाही. 

पुढील काही दिवस कीटक रस्त्यावर असेच दिसण्याची शक्‍यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. नागपुरात यापूर्वी ॲफिडस्वॉर्म, कायरोनॉमस, पतंग आदी किड्यांचा त्रास बरेचदा झाला आहे. मात्र, सध्या दिसत असलेला किडा त्यांच्या वर्गातला नसून पूर्णत: वेगळा आहे. सोपेचे किडे विषारी, घातक नसले तरी डोळ्यांत जाण्यापासून संरक्षण करायला हवे.  

सध्या नागपूरकरांना त्रास देणाऱ्या किड्याचे वैज्ञानिक नाव जाड्‌स असून त्याला बोलीभाषेत तज्ज्ञ मंडळी सोपेचे किडे असे संबोधतात. यांचा रंग हिरवा असतो. तापमानात होणारा अचानक बदल यांच्यासाठी अत्यंत अनुकूल असतो.

बेडकांची संख्या कमी होतेय्‌ 
नद्यांच्या पाण्यामध्ये सांडपाणी आणि रसायनयुक्त पाणी मिसळल्याने या पाण्याच्या प्रदूषणाची पातळी खूप वाढली आहे. आता या पाण्यासोबतचा गाळ नदीपात्रामध्ये साचला आहे. या गाळामुळे बेडकांची संख्या कमी झाली. या प्रकारच्या किड्यांना बेडूक आणि वटवाघुळ खातात. त्यामुळे, किडे इतक्‍या जास्त प्रमाणात दिसून येत नाहीत. मात्र, प्रदूषित जलसाठ्यांमुळे बेडकांची संख्या कमी झाल्याचा हा दुष्परिणाम आहे.

Web Title: nagpur vidarbha news green worm