वर्षभरानंतर सोयाबीनसाठी मदत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

नागपूर - कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या सोयाबीनची आवक वाढल्याने दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्यांना २५ क्विंटलपर्यंत नुकसानभरपाई यावर्षी शासनाकडून दिली जाणार आहे.

२०१६ च्या खरीप हंगामात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले होते. बाजारात सोयाबीनची आवक वाढल्याने दर घसरले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी होती. त्यानंतर शासनाकडून प्रतिक्विंटल २०० रुपये मदत देण्याचे जाहीर केले होते. आता वर्षभरानंतरही ही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्‍टोबर २०१६ ते डिसेंबर २०१६ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. प्रतिशेतकरी २५ क्‍विंटलपर्यंतच ही मदत मिळणार आहे.

Web Title: nagpur vidarbha news help for soyabean