दारू लपविल्याने पतीची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

नागपूर - दारूच्या पूर्णतः आहारी जाणाऱ्यांना रोज दारू प्यायल्याशिवाय चैन पडत नाही. दारूसाठी जीव घेण्यापासून तर जीव देण्यापर्यंत हे मद्यपी तयार होतात. अशाच एका शासकीय कर्मचारी असलेल्या मद्यपीने घरात आणलेली दारूची बाटली पत्नीने लपविल्यामुळे रागाच्या भरात आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास हुडकेश्‍वरमध्ये उघडकीस आली. रामप्रवेश सिंग देवनंदनसिंग बिसेन (५६, रा. श्रीरामनगर) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्‍तीचे नाव आहे.

रामप्रवेश सिंह हे वर्धा येथे एमएसईबी विभागात नोकरीला आहेत. पोळा असल्यामुळे ते दारू पिऊन घरी आले. पाडव्याला दारूचे दुकान बंद असल्यामुळे त्यांनी एक बाटली सोबत आणली होती. रात्री साडेनऊ वाजता घरी येताच त्यांनी हातपाय धुण्यासाठी पाणी मागितले. दरम्यान, ते घरात गेले आणि दारूची बाटली बेडरूममध्ये ठेवली. त्यानंतर बाथरूममध्ये जाऊन हातपाय धुऊन बाहेर आले. त्यांनी दारूची बाटली शोधली असता ती मिळून आली. त्यांनी घरात शोधाशोध केली. त्यानंतर पत्नीला विचारणा केली असता तिने बाटली लपवून ठेवल्याचे सांगितले. रामप्रवेश यांनी बाटली मागितली आणि न दिल्यास वाईट परिणाम होतील, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांनी दारात असलेल्या संत्र्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

शंकरपूर गोंडवाना शाळेजवळील गौतम मांडवे यांच्या शेतातील विहिरीच्या पाण्यात १८ ऑगस्टला ४० ते ४५ वर्षे वयोगटातील अनोळखी व्यक्‍तीचा मृतदेह तरंगताना आढळला. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: nagpur vidarbha news husband suicide by wine