शाळेजवळ अवैध मांसविक्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

धंतोली झोनने हटविली दुकाने - मांस, चिकन जप्त

नागपूर - पोळ्याच्या पाडव्याची संधी साधत अनेकांनी आज रस्त्यांच्या बाजूलाच मांस, चिकनची दुकाने थाटली. व्यवसायासाठी विक्रेत्यांनी शाळांचा परिसरही सोडला नसल्याचे चित्र होते. अखेर एका शाळा प्रशासनाने केलेल्या तक्रारीवरून धंतोली झोनने मांस, चिकन विक्रेत्यांच्या अवैध धंद्याला लगाम लावला. 

श्रावण महिन्यात मांस, चिकनला हात न लावणारे आज त्यावर तुटून पडतात. खवय्यांची गरज भागविण्यासाठी आज अनेकांनी रस्त्याच्या बाजूला तसेच मिळेल त्या ठिकाणी मांस, चिकन विक्रीची दुकाने थाटली. राजाबाक्षा ते अजनी मार्गावरील नवयुग माध्यमिक शाळेजवळही काहींनी दुकाने थाटली. या शाळा प्रशासनाने महापालिका आयुक्तांकडे ऑनलाइन तक्रार केली. आयुक्तांनी तत्काळ धंतोली झोनला या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले. त्यामुळे या रस्त्यांवरील मांस व चिकन विक्रेत्यांवर प्रवर्तन विभागाच्या मदतीने धंतोली झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली. झोनमधील श्‍याम धर्ममाळी यांच्या नेतृत्वात या रस्त्यावरील मांस, चिकन विक्रेत्यांची दुकाने हटविण्यात आली. मांसविक्रेत्यांनी कारवाईला विरोध केला. परंतु, त्यांचा विरोध मोडीत काढत मांस, चिकन जप्त करण्यात आले. नवयुग शाळेजवळील दुकानेही हटविण्यात आली. कॉटन मार्केट परिसरातील अतिक्रमणधारकांनाही हुसकावण्यात आले. 

Web Title: nagpur vidarbha news illegal meat sailing near school