जोशीच्या संपत्तीचा लिलाव लवकरच

जोशीच्या संपत्तीचा लिलाव लवकरच

४० कोटींच्या मालमत्तेचा समावेश; ५०० कोटींनी फसवणूक

नागपूर - समीर जोशी आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी यांनी ‘श्रीसूर्या’ गुंतवणूक रकमेच्या दुप्पट-तिप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून नागपूरसह राज्यातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांनी गंडा घातला होता. सध्या समीर जोशी मध्यवर्ती कारागृहात आहे. गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाचा श्रीसूर्या कंपनीचा तपास अंतिम टप्प्यात असून लकवरच जोशींची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता लिलावात काढण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. 

महाराष्ट्रातील तब्बल पाच हजार ९२ गुंतवणूकदारांना समीर व पल्लवी जोशी यांनी ५०० कोटींपेक्षा अधिक रकमेचा गंडा घातला आहे. समीरने श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट नावाने कंपनी स्थापन केली होती. जोशी दाम्पत्याने श्रीसूर्यात पैसा गुंतविण्यासाठी एजंट, सबएजंट नेमले होते. 

त्यांनी शासकीय सेवेतील अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी, राजकीय नेते आणि उद्योजकांना हेरून पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते.

स्कीमनुसार १८ महिन्यांत पैसे दुप्पट तर २५ महिन्यांत तिप्पट पैसे परत करण्याच्या आमिषाला बळी पडणाऱ्यांच्या आकड्यात दिवसेंदिवस कमालीची वाढ झाली. पाहता-पाहता ५ हजार ९२ गुंतवणूकदारांपर्यंत संख्या पोहोचली. वर्षभरातील टर्नओव्हर शेकडो कोटींमध्ये गेला. त्यामुळे समीर आणि पल्लवीचे रोजचे उत्पन्न ५० लाख रुपये झाले होते. त्या पैशातून स्वतःसाठी बीएमडब्ल्यूसह फोर्ड, मसर्डीज, स्कोडासारख्या ७ महागड्या कार विकत घेतल्या. तसेच ५३ बसेस विकत घेतल्या होत्या. त्यापैकी ३६ स्कूलबसेस तर अन्य ट्रॅव्हल्स बसेस आहेत. नागपुरातील नारायण विद्यालयात सर्वाधिक १७, सेंट लॉरेन्स स्कूलमध्ये ८, इरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये ९ तर गोंडवाना पब्लिक स्कूलमध्ये दोन बसेस भाडेतत्त्वावर दिल्या होत्या. यासोबतच चंद्रपुरात श्रीसूर्या दूध कंपनी, अमरावतीमधून चॉकलेट व चहापत्ती पावडर कंपनी उघडली होती. श्रीसूर्याच्या मालकीची जवळपास ४० कोटी रुपयांची संपत्ती लिलावासाठी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे येत्या महिन्यात लिलावात निघणार आहे.
 

संपत्तीचा खजिना
समीर आणि पल्लवी जोशी यांच्याकडे तीन कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार आणि अडीच कोटी रुपयांच्या अन्य कार आहेत. यासोबतच नागपूर येथील आलिशान दोन कार्यालये, दोन घरे आणि शहरातील वेगवेगळ्या ११ ठिकाणी असलेले कोट्यवधी रुपये किमतीच्या भूखंडांसह काही हिरे-सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. या सर्व मालमत्तेचा लिलाव पोलिस करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com