चिमुकल्यांनी साकारले आकाश कंदील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

नागपूर - दिवाळीच्या सणात आकाश कंदीलाला विशेष महत्त्व आहे. काही जण घरीच आकाश कंदील तयार करीत असतात. विद्यार्थ्यांच्या या कलागुणांना वाव देण्यासाठी सकाळ एनआयईतर्फे सोमवारी (ता. ९) श्रीनिकेतन माध्यमिक विद्यालयात आकाश कंदील बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुंदर आकाश कंदील तयार केले.

सकाळ एनआयईतर्फे आयोजित कार्यशाळेत ५५ विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे आकाश कंदील तयार केलेत. कार्यशाळेत कला शिक्षक राजकुमार कावळे यांनी विविध प्रकारचे आकाश कंदील कसे तयार करावे याचे प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांकडून आकाश कंदील तयार करून घेतले. 

या वेळी विद्यार्थ्यांना संचालक ममता गवळी, मुख्याध्यापक विजय मालेवार व पर्यवेक्षिका भावना भोतमांगे यांचे मार्गदर्शन लाभले. आयोजनासाठी कला शिक्षक किशोर सोनटक्‍के व सदाशिव ठाकरे यांनी सहकार्य केले.

अशा प्रकारच्या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळतो. त्यांच्यातील गुणांना  योग्य व्यासपीठ मिळते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नवी चालना व बळ देण्याचे काम सकाळ एनआईतर्फे प्रत्येक वेळी करण्यात येते.
- विजय मालेवार, मुख्याध्यापक, श्रीनिकेतन माध्यमिक विद्यालय.

सकाळ एनआयईने राबविलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे आम्हाला आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. ‘सकाळ’ने अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांना मदत केली. त्याबद्दल सकाळचे मनापासून आभार मानतो.
- ओमकार शोभणे, विद्यार्थी.

Web Title: nagpur vidarbha news lantern making by child