रेल्वेत राहिलेला लॅपटॉप मिळाला परत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

हेल्पलाइन ठरली उपयुक्त- काही वेळातच साहित्य स्वाधीन

नागपूर - रेल्वे प्रवासात एकदा हातून सुटलेले साहित्य परत मिळणे कठीणच. बहुतेक प्रवाशांचा हाच अनुभव. पण, दुर्ग येथील एक प्रवासी फारच भाग्यवान ठरला. रेल्वेत सुटलेल्या बॅगबाबत त्याने रेल्वे हेल्पलाइनवर माहिती दिली आणि काही वेळातच बॅग आणि त्यातील लॅपटॉप व अन्य साहित्य परत मिळाले.

मलय पाल (३८, रा. दुर्ग, छत्तीसगड) असे या भाग्यवान प्रवाशाचे नाव आहे. ते सोमवारी सियालदाह-एलटीटी एक्‍स्प्रेसच्या बी-९ डब्यातून प्रवास करीत होते. दुर्ग स्थानकावर ते उतरले. पण, अनावधानाने लॅपटॉप, चार्जर, माउस व अन्य साहित्य असा एकूण ४५ हजारांचा मुद्देमाल असलेली बॅग डब्यातच सुटली. ही बाब लक्षात येईपर्यंत रेल्वे पुढच्या प्रवासाला रवाना झाली होती. यामुळे त्यांनी रेल्वेच्या १८२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून मदत मागितली. रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक उपनिरीक्षक अभय बेदरकर यांना याबाबत माहिती देण्यात आली. संबंधित एक्‍स्प्रेस नागपूर स्थानकावर पोहोचताच त्यांनी डब्यात जाऊन पाहणी केली असता बॅग तिथेच होती. दुसऱ्या गाडीने पालसुद्धा नागपूर स्थानकावर पोहोचले. लॅपटॉपची बॅग त्यांचीच असल्याची खात्री केल्यानंतर कागदोपत्री कारवाई पूर्ण करून बॅग त्यांच्या सुपूर्द करण्यात आली. 

Web Title: nagpur vidarbha news laptop return by railway