लिचीचे अतिसेवन मुलांच्या मेंदूसाठी घातक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

नागपूर - आकर्षक रंग आणि मधुर स्वाद यामुळे लिचीची फळे प्रसिद्ध आहेत. साधारणत: द्राक्ष, आंबा आणि स्ट्रॉबेरी यांचा हंगाम संपत असताना लिचीचा मोसम येतो. परंतु, या फळाचे अतिसेवन मुलांच्या मेंदूवर विपरीत परिणाम करते. संशोधनातून काही मुलांचा मेंदूचा गूढ रोगाने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यास लिचीचे अतिसेवन कारणीभूत असल्याचे तर मिरगीचे हेच कारण असल्याचे सांगितले जाते.     

बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील मुले दरवर्षी मोठ्या प्रमाणावर मेंदूच्या आजाराने दगावतात. या परिसरात लिचीच्या फळाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. उष्णता, कुपोषण, मॉन्सून व कीडनाशके ही मृत्यूची कारणे सांगण्यात येतात. संशोधकांनी या मृत्यूचे गूढ उलगडले असता १९९५ मध्ये बिहारमध्ये अनेक मृत्यू लिचीच्या सेवनामुळे झाल्याचे एका मासिकात प्रकाशित झाले होते.  

नवी दिल्ली येथील नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल तसेच अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन यांनी रुग्णालयात पाहणी करून नंतर प्रयोगशाळेतही संशोधन केले. लिचीच्या फळात काही संसर्गजन्य जंतू किंवा विषारी धातू आढळल्याचे पुढे आले. हायपोग्लायसिन ए किंवा मेथिलीने सायक्‍लो प्रोपायली ग्लिसरीन हे फळातील विष तपासण्यात आले. त्यामुळे हायपोग्लायसिमिया होऊन चयापचयाची क्रियाही बिघडते. लिची फळ खाऊन रात्री जेवले नाही, तर त्याचे खूप वाईट परिणाम होतात. या रुग्णांच्या लघवीत हायपोग्लायसिन ए व एमसीपीजी हे मेटॅबोलाइट वाढत असल्याचे प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले.

मुंबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय ट्रॉपिकल न्यूरोलॉजी परिषदेत डॉ. अशोक श्रीवास्तव यांनी लिचीसंदर्भातील विषयावर सविस्तर संशोधनात्मक विश्‍लेषण सादर केले. त्यांनी लिचीच्या अतिसेवनाचा मेंदूवर विपरीत परिणाम होत असल्याचे मत व्यक्त केले. लिचीचे सेवन कमी करणे, सायंकाळचे जेवण न टाळणे, नेहमी ग्लुकोजची तपासणी करणे हे उपाय यावर आहेत. यासंदर्भातील जनजागरण ब्रेन विकमध्ये करण्यात येत आहे. 
- डॉ. चंद्रशेखर मेश्राम, अध्यक्ष, वर्ल्ड ट्रॉपिकल न्यूरोलॉजी, नागपूर

Web Title: nagpur vidarbha news litchi hypertension is dangerous for children's brain