‘महामेट्रोचा स्टॉल ठरला अव्वल’

नागपूर - माहिती तंत्रज्ञान मंत्री के. टी. रामा राव यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना डॉ. बिजेश दीक्षित.
नागपूर - माहिती तंत्रज्ञान मंत्री के. टी. रामा राव यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना डॉ. बिजेश दीक्षित.

नागपूर - हैदराबाद येथे झालेल्या दहाव्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरेन्स व एक्‍स्पो’मध्ये महामेट्रोला सर्वोत्तम प्रदर्शकाचे प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले. तेलंगणाचे नगरविकास, माहिती तंत्रज्ञान मंत्री के. टी. रामा राव यांच्या हस्ते महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाचे सचिव डी. एस. मिश्रा, महापालिका प्रशासन व शहरी विकास सचिव नवीन मित्तल उपस्थित होते. 

महामेट्रोच्या शिस्तबद्ध कार्याचे आणि नियोजनबद्ध कार्यप्रणालीचे तोंड भरून कौतुक केले. संमेलनात दिल्ली मेट्रो, मुंबई मेट्रो, चेन्नई तसेच अहमदाबाद गांधीनगर मेट्रो स्पर्धक म्हणून सामील होते. महामेट्रोच्या प्रस्तुतीकरणाने महामेट्रोच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. पुढील वार्षिक संमेलन नोव्हेंबर २०१८ मध्ये ‘ग्रीन अर्बन मोबिलिटी’ नागपूर येथे घेण्यात येणार असल्याची घोषणादेखील यावेळी करण्यात आली. 

पहिल्या दिवशी भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकया नायडू यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबाद शहरात यंदाच्या या वार्षिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील वेगवेगळ्या भागातील रहदारी पर्यायांबरोबरच विविध भागांतील मेट्रोबद्दल प्रदर्शनाद्वारे माहिती दिली गेली. मात्र, तीनही दिवस  येथे लावण्यात आलेला महा मेट्रोचा स्टॉल मान्यवरांसोबतच नागरिकांच्याही निरंतर आकर्षणाचा मुख्य केंद्र बनला राहिला. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित नागपूर मेट्रो आणि पुणे मेट्रो टीमसह पूर्णवेळ उपस्थित होते. 

स्टॉलमध्ये समाविष्ट असलेले ५डी बिम, मेट्रो स्टेशनचे डिझाईन्स, मेट्रोसंवाद, सोशल मीडियाचा विधायक वापर, ऊर्जा बचत, वर्धा रोड येथे दुहेरी पल्ल्याच्या रस्त्यासह आरएएल संरचनासाठीचा ग्रीन उपक्रम.

स्टॉलमध्ये इलेक्‍ट्रिक फीडर सर्व्हिस कारचे प्रदर्शन तसेच फीडर सर्व्हिसबद्दल सखोल माहिती दिली गेली. संपूर्ण दिवस स्टॉलला जगभरातील अनेक मान्यवरांनी आणि तज्ज्ञ मंडळींनी भेट दिली आणि माहेमेट्रोची कार्यप्रणाली पाहून कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com