कवितेतून व्यक्त झाले ‘माझे बाबा’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

नागपूर  - जून महिन्यातील तिसरा रविवार जागतिक पितृदिन म्हणून साजरा केला जातो. मातृदिनाला पूरक म्हणून जगभरात पितृदिन साजरा करण्याची संकल्पना १९०८ सालापासून पुढे आली. या पितृदिनानिमित्त वडिलावर (बाबा, पप्पा, डॅडी, फादर) ‘माझे बाबा’ या हॅशटॅगने कविता आमंत्रित करण्यात आल्या. ‘सकाळ’च्या सोशल प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन हे कविता संमेलन सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. वडिलांवरील कवितांचे ऑनलाइन संमेलन फेसबुक लाइव्ह, व्हॉट्‌सॲप ग्रुप, ट्विटरवर सुरू आहे. या माध्यमातून अनेकांनी बाबाविषयीच्या भावना काव्यातून मांडल्या. 

आजही घ्या सहभाग
ऑनलाइन कविता संमेलनात आपण आजही सहभागी होऊ शकता. कविता पोस्ट करताना #माझेबाबा#कविता #SakalNagpur असे लिहायला विसरू नका.

Web Title: nagpur vidarbha news maze baba in poem