मेडिकलची रुग्णसेवा वाऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

नागपूर - निवासी डॉक्‍टरांच्या सामूहिक रजा आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मेडिकलमध्ये सर्व वॉर्ड रिकामे दिसले. एकही डॉक्‍टर कर्तव्यावर दिसत नव्हते. तर निवासी डॉक्‍टरांच्या संपकाळात वरिष्ठ डॉक्‍टर सेवा देतात, परंतु रविवार असल्याने वरिष्ठ डॉक्‍टरांनीही मेडिकलकडे पाठ फिरवल्याने येथील रुग्णसेवा वाऱ्यावर आहे. परिचारिकांच्या भरवशावर सारे वॉर्ड असून त्यादेखील वॉर्डात लिपिकीय कामात गुंतल्या असल्याचे चित्र वार्डात होते. दरम्यान, आंदोलनाची दखल घेत बैठकीसाठी संचालकांनी निवासी डॉक्‍टरांना मुंबईला बोलावले.

मेडिकलमध्ये निवासी डॉक्‍टरांना सुरक्षा प्रदान करण्याचे वचन पाळण्यात आले. सुरक्षारक्षक उपलब्ध करून देण्यात आले. परंतु महिनाभरातच सारे सुरक्षारक्षक अचानक सोडून गेल्याने पुन्हा निवासी डॉक्‍टर सुरक्षेशिवाय काम करीत आहेत. दोन दिवसात सुरक्षारक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन  न पाळल्यामुळे पुन्हा सामूहिक रजा आंदोलन पुकारण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे सांगत मेयोतील निवासी डॉक्‍टरही या आंदोलनात उडी घेतली, असे डॉ. प्रदीप कासवन यांनी सांगितले.

मेडिकलमध्ये ४५ वॉर्ड असून साडेतीनशेपेक्षक्षा अधिक निवासी डॉक्‍टर आहेत. २४ तास निवासी डॉक्‍टर कॅज्युअल्टी, अतिदक्षता विभाग, वॉर्ड, रेडिओलॉजी अशा विविध विभागात काम करतात. वारंवार रुग्णांच्या नातेवाईकांशी खटके उडत असल्याने मारहाणीच्या घटना घडतात. यामुळे शासनाने निवासी डॉक्‍टरांच्या सुरक्षेची हमी घेत राज्यातील १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा रक्षकांवर ३३ कोटी खर्च करण्याचा निर्णय घेतला.

२१ दिवसांपासून हरवले सुरक्षाकवच  
नातेवाईकांपासून निवासी डॉक्‍टरांचे रक्षण करणारे महाराष्ट्र सुरक्षामंडळाचे सुरक्षाकवच २१ दिवसांपूर्वी हरवले. निवासी डॉक्‍टरांनी निवेदनाद्वारे, शिष्टमंडळाद्वारे भेट घेऊन प्रशासनाला सुरक्षा रक्षक प्रदान करण्याची विनंती केली. प्रशासनाने निवासी डॉक्‍टरांचे निवेदन त्यांच्या सुरक्षारक्षकांचा प्रश्‍न वैद्यकीय संचालकांकडे सादर केला. नेहमीप्रमाणे संचालकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने निवासी डॉक्‍टर संतप्त झाले आणि निवासी डॉक्‍टरांनी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या कक्षापुढे आंदोलन सुरू केले. दोन दिवस आंदोलन केल्यानंतरही प्रश्‍न न सुटल्याने अखेर सामूहिक रजा आंदोलनाला सुरवात झाली. 

दंतच्या डॉक्‍टरांचा पाठिंबा
मेडिकलमधील निवासी डॉक्‍टरांच्या सामूहिक रजा आंदोलनाला शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्‍टरांनी पाठिंबा घोषित केला. येथील निवासी डॉक्‍टरांनीदेखील सामूहिक रजा आंदोलन सुरू केले. सोबतच भौतिकोपचार व व्यवसायोपचार विभागाच्या विद्यार्थ्यांनीदेखील सामूहिक रजा आंदोलन सुरू केल्यामुळे प्रशासन कारवाई करण्यास हतबल झाले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur vidarbha news medical patient service