डोळ्यात तेल घालून सुरक्षा करतो जी!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - ‘सायेब, डोळ्यात तेल घालून सुरक्षेसाठी तैनात असतो... महिना संपला की, हाती अवघे बारा हजार रुपये येतात. घरात दानापाणी आणायचा, पोरायचं शिक्षण कराचं की, भाडे अदा करायचे..., काय करावे सायेब... या पैशात धड जगताही येत नाही अन्‌ कुटुंबाले जगवताही येत नाही,’ ही कैफियत मेडिकलमधील सुरक्षा रक्षकांची आहे.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे हे सर्व सुरक्षारक्षक हक्क मागण्यासाठी मेडिकल आणि मेयोतून मुंबईच्या दिशेने सोमवारी रात्री रवाना झाले. त्यामुळे निवासी डॉक्‍टरांची सुरक्षा वाऱ्यावर आली आहे. डॉक्‍टरांना होत असलेल्या मारहाणीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात ५०० सुरक्षारक्षक एप्रिल २०१७ मध्ये वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नियुक्त केले.

महाराष्ट्र सुरक्षा महामंडळामार्फत टप्प्याटप्प्याने सुरक्षारक्षक पुरविण्यात आले. नागपूरसह राज्यात एकूण ११०० सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. वर्षाला शासनाकडून निवासी डॉक्‍टरांच्या या सुरक्षेवर ३३ कोटींचा निधी खर्च करण्यात येतो. मेडिकलमध्ये ९९, तर मेयोत ६० सुरक्षारक्षक सध्या कार्यरत आहेत. मात्र, अचानक रविवारी रात्रीपासून काम बंद केले. अकरा महिन्यांच्या करारावर या जवानांना तैनात केल्यानंतर वेठबिगारीसारखी वागणूक मिळत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मूळ आस्थापनेकडून २४ ते २६ हजार वेतन अदा करण्यात येत असताना येथे केवळ १२ ते १४ हजार रुपये वेतन मिळत आहे. विरोधात सर्व रक्षकांनी एल्गार पुकारला. लोकतंत्र मुक्ती आंदोलनतर्फे डोळ्यात तेल घालून सुरक्षा करतो जी!  मुंबई ते पुणे असा मार्च काढण्यात येणार आहे. कंत्राटी पद्धत रद्द करून थेट शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: nagpur vidarbha news medical security condition