दोन-तीन दिवसांनी मॉन्सून नागपुरात?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

पेरण्या खोळंबल्याने बळीराजा चिंतित - केवळ दोनच टक्‍के पेरण्या

नागपूर - मॉन्सूनने विदर्भात प्रवेश करून तब्बल पाच दिवस लोटूनही अद्याप नागपूर जिल्ह्यात आगमन झाले नाही. मॉन्सूनचा अतिशय संथगतीने सुरू असलेला प्रवेश लक्षात घेता, नागपूरचा उंबरठा ओलांडायला आणखी दोन-तीन दिवस लागणार आहे. तशी शक्‍यता नागपूर वेधशाळेतर्फे वर्तविण्यात आली आहे.  

प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक अविनाश ताठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉन्सून गेल्या १६ जूनलाच गडचिरोली व चंद्रपूरमार्गे विदर्भात दाखल झाला. मात्र, त्यानंतर मॉन्सूनचा प्रवास कमजोर पडल्यामुळे नागपूरसह विदर्भाच्या उर्वरित भागांत यायला उशीर होत आहे. मॉन्सूनच्या पुढील प्रवासासाठी परिस्थिती अनुकूल असली तरी नागपूर जिल्ह्यात दाखल होण्याला किमान दोन ते तीन दिवस लागण्याची शक्‍यता आहे. गेल्या सहा-सात वर्षांचा इतिहास बघितल्यास यावेळी प्रथमच मॉन्सून नागपुरात २० जूननंतर येत आहे. यापूर्वी २०१२ मध्ये मॉन्सूनचे उशिरा म्हणजेच २० जूनला आगमन झाले होते. पावसाने दडी मारल्याने बळीराजा कमालीचा चिंतित आहे. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या असून, आतापर्यंत केवळ दोनच टक्‍के पेरण्या आटोपल्या आहेत. ढगाळ वातावरण व उन्हाच्या चटक्‍यांमुळे उकाडादेखील प्रचंड प्रमाणावर जाणवू लागला आहे. त्यामुळे बळीराजासह शहरवासीही पावसासाठी आतुर झाला आहे.

Web Title: nagpur vidarbha news monsoon