धारदार शस्त्राने मेहुण्याचा खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

नागपूर - बहिणीच्या प्रेमविवाहाला विरोध केल्याने वचपा काढण्यासाठी जावयाने साळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. रक्‍ताबंबाळ अवस्थेत खाली पडल्यानंतर त्याच्या अंगावरून चारचाकी नेऊन खून केला. ही थरारक घटना मंगळवारी दुपारी भांडेवाडी डम्पिंग यार्डजवळ घडली. सुमित सुभाष कांबळे (वय २४, रा. सूरजनगर, भांडेवाडी) असे मृताचे नाव आहे. तर कमलेश नारायण दुबे (२४) आणि  शेखर चंद्रशेखर दुबे (३०) रा. भांडेवाडी अशी आरोपींची नावे आहेत. 

सुमित लहान भाऊ आणि बहिणीसोबत रहायचा. तो मनपाअंतर्गत असलेल्या कनक रिसोर्सेसमध्ये कचरा व्यवस्थापनाची गाडी चालवीत होता. त्याची कमलेशसोबत मैत्री होती. कमलेशचे सुमितच्या बहिणीशी सूत जुळले. दोघांच्या प्रेम प्रकरणाबाबत सुमितला कळले. त्यावरून सुमित आणि कमलेशमध्ये वादही झाला. सुमितने लग्नास विरोध केल्याने कमलेशने पळून जाऊन सुमितच्या बहिणीशी लग्न केले. मंगळवारी दुपारी दोघेही भांडेवाडी डम्पिंग यार्डला गेले होते. सुमित आणि राहुल देशमुख हे दोघेही वाहनाच्या खाली उतरले आणि कमलेश आणि त्याचा चुलत भाऊ शेखर यांना वाहन मागे घेण्यास सांगितले. कमलेश आणि शेखरने वाहनातून चाकू काढून सुमितवर धावून गेले.

पंधरा दिवसांपूर्वी केला प्रेमविवाह
कमलेशसोबत बहिणीचे प्रेमप्रकरण सुरू असल्याबाबत सुमितला कळताच त्याने बहिणीला समजावण्याचा प्रयत्न केला. दारुड्या ड्रायव्हरसोबत तिने लग्न करणे त्याला मान्य नव्हते. परंतु कमलेशने १५ दिवसांपूर्वी चंद्रपुरात जाऊन एका मंदिरात सुमितच्या बहिणीशी लग्न केले होते.  

बहिणीने गमावला भाऊ अन्‌ पती
सुमितचे आई-वडील तो लहान असतानाच गेले. त्याने लहान भाऊ आणि बहिणीचा वडिलांप्रमाणे सांभाळ केला. बहिणीच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून तो स्वतः रात्रंदिवस राबत होता. मात्र तिने दारुड्याशी प्रेमविवाह केल्याने तो दु:खी होता. सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या सुमितच्या बहिणीने भाऊ गमावला. तर खुनाच्या आरोपात पतीला जन्मठेप झाल्याने पतीच्या प्रेमासही मुकली.

Web Title: nagpur vidarbha news murder