गोळीबारात एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

नागपूर - पाचपावलीतील लष्करीबागमधील किदवाई मैदान परिसरात झालेल्या दोन गटांतील वादातून एकमेकांवर शस्त्र काढले. यामध्ये एका गटातील आरोपींनी दुसऱ्या गटातील युवकांवर गोळीबार केला. यामध्ये आबिद शेख (वय २४, रा. मोमिनपुरा) नावाच्या युवकाला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचपावलीतील लष्करीबाग परिसरात आज रविवारी सायंकाळी ६ वाजता दोन गट क्षुल्लक व वर्चस्वाच्या वादातून आमने-सामने उभे ठाकले. आसिफ शेख, बॉबी, आसिफ कोयला आणि स्वामी या आरोपींनी अन्य गट आबिद शेख याच्यावर परिसरातील वर्चस्व सहन न झाल्यामुळे वाद घातला. त्यानंतर आसिफ आणि आबिद यांच्या गॅंगमध्ये बाचाबाची झाली. आसिफने आबिदवर अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये आबिदच्या डोक्‍यात गोळी लागली. त्यामुळे गंभीर जखमी आबिदला मेयोत दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आबिदचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी गुन्हे दाखल केले. आसिफ शेख आणि आसिफ कोयला या दोघांना अटक केली.  अन्य आरोपी बॉबी, स्वामी हे पळून गेले. 

दुचाकीचा लागला होता धक्‍का
आबिद शेख आणि आसिफ शेख यांच्यात चार महिन्यांपूर्वी वाद झाला होता. मात्र, आज रविवारी दुपारी ४ वाजता दहा नंबर पुलाजवळ आबिद आणि आसिफ यांच्या दुचाकीची टक्‍कर झाली. त्यांच्यात पुन्हा वाद झाला. एकमेकांना पाहून घेण्याची धमकी देऊन लष्करीबागजवळील मैदानाजवळ भेटण्याचे सांगून निघून गेले. 

दोघांच्याही गॅंग समोरासमोर
दोघांनीही एकमेकांना धमक्‍या दिल्यानंतर ठरल्याप्रमाणे लष्करीबाग मैदानावर दोन्ही गॅंगमधील आठ ते दहा युवक जमा झाले. सर्वच युवकांकडे शस्त्रे होती. आरोपी आसिफ शेख हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असून, त्याची हुसेनी नावाने संघटना आहे. आसिफ आणि त्याच्या साथीदारांनी पिस्तूल काढून आबिदच्या गॅंगवर अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये एक गोळी आबिदच्या डोक्‍यात लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

तणावपूर्ण वातावरण
आसिफ आणि आबिद या गॅंगमध्ये झालेल्या गॅंगवारनंतर या लष्करीबाग परिसरात पोलिसांचा ताफा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला. या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. आसिफ शेखच्या गटातील युवकांनी अटक होण्याच्या धाकाने पळ काढला होता. तर, आबिद शेखचे समर्थक आसिफच्या टोळीतील युवकांचा शोध घेत फिरत होते. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण होते.

Web Title: nagpur vidarbha news murder in firing