थकबाकीदारांच्या घरापुढे वाजणार नगारा

थकबाकीदारांच्या घरापुढे वाजणार नगारा

मनपा आज काढणार अब्रूचे धिंडवडे - बॅनरही लावणार 

नागपूर - थकीत मालमत्ता कर व पाणी कर वसुलीसाठी महापालिकेने आजपासून अभय योजना सुरू केली. मात्र, अभय योजनेचा काहीही परिणाम न होणाऱ्या दहा सर्वोच्च थकीत मालमत्ता कर व पाणी करधारकांची नावे महापालिकेने निश्‍चित केली. उद्या दिवसभर या थकबाकीदारांच्या घरासमोर, प्रतिष्ठानांपुढे झोनचे सभापती अधिकाऱ्यांसह नगारा वाजविणार असल्याचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी आज सांगितले.

थकबाकीदारांच्या अब्रूचे धिंडवडे काढण्याची महापालिकेच्या इतिहासात पहिलीच वेळ आहे. 

महापालिकेने थकबाकीदारांना शेवटची संधी देत आजपासून अभय योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत थकबाकीदारांना दंडाच्या रकमेपासून सवलत देऊन केवळ मूळ रक्कम भरण्यासाठी प्रेरित केले जात आहे. मात्र, झोनच्या सहायक आयुक्तांनी काही नावे सांगितली, जी थकीत  रक्कम भरत नाही. त्यामुळे त्यांची नावे निश्‍चित करण्यात आली असून उद्या त्यांच्या घरासमोर संबंधित झोनचे सभापती, नगरसेवक व अधिकारी जातील व नगारा वाजवतील. 

त्यांच्या घरासमोर बॅनरही लावण्यात येणार आहे. यावर थकीत रकमेसह विकासाची कामे त्यांच्यामुळे रखडल्याचा उल्लेखही करण्यात येणार असल्याचे जोशी यांनी नमूद केले. एवढेच नव्हे नगारा वाजविल्यानंतर संबंधित मालमत्ताधारकाला फूल देऊन गांधीगिरीही करणार असल्याचे ते म्हणाले. पत्रकार  परिषदेत जलप्रदाय समिती सभापती राजेश घोडपागे, प्रतोद दिव्या धुरडे आदी उपस्थित होते. 

मालमत्तेचा लिलाव करण्यासाठी प्रक्रिया सुरू
मागील काही वर्षांत अनेकांना मालमत्ता कर भरण्याची अंतिम नोटीस देऊन त्यांना जप्तीचा इशारा दिला. काहींच्या मालमत्ता जप्तही करण्यात आल्या. मात्र, आता या मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया उपायुक्त रवींद्र देवतळे यांनी सुरू केल्याचे जोशी यांनी सांगितले. 

चेक बाऊन्सप्रकरणी गुन्हे दाखल करणार 
मागील अभय योजनेदरम्यान अनेकांनी महापालिकेला चेकद्वारे पाणी कर भरून दंड माफ करून घेतला. परंतु, त्यानंतर त्यांचे चेक बाऊन्स झाले. आता ते रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे महापालिकेने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे जोशी यांनी नमूद केले.

यांच्या घरासमोर वाजणार नगारा 

(मालमत्ता कर) 
नावे                                        थकीत रक्कम 

सरदारजी की रसोई बजाजनगर          ५६ लाख २२ हजार 
कंट्रीवाईड टूर्स व ट्रॅव्हल्स               १६ लाख 
एम्प्रेस मॉल                               २ कोटी ६० लाख 
प्रल्हाद पडोळे नंदनवन                  १० लाख १८ हजार 
विजय साखरकर चिटणीस पार्क         १४ लाख ९८ हजार 
भिसीकर बंधू लेंडी तलाव                ६ लाख 
प्रमिला संतोष जैन इतवारी               २० लाख
नागपूर हाउसिंग कंपनी पिवळी नदी         १९ लाख 
डॉ. जुलेखा दौड गोरेवाडा               १२ लाख 

(पाणी कर) 
विठ्ठल भांगे                              १ लाख ७८ हजार 
बिदलराम फुलसुंगे तेलंगखेडी          ३ लाख ७७ हजार 
श्रीधर राजगे नरेंद्रनगर                  ३९ हजार ५९५ 
बिंदू दुर्गा तुर्केल सिरसेपठ             ८१ हजार 
तानबा पाटील बिडीपेठ                 ६९ हजार ६००
एस. जी. हरदास चितळे गल्ली        ३३ हजार 
विदर्भ पॅलेस चांभारनाला              १ लाख ३१ हजार
ललित पटेल लकडगंज                ९४ हजार 
टिकमचंद मनकानी जरीपटका           १ लाख ३१ हजार
मोहनसिंग पंजाबी कडबी चौक        ३ लाख ३८ हजार 
पूनम चेंबर मार्केट                     ४० लाख ८१ हजार 
हिबिस्कस हॉटेल सिव्हिल लाइन्स      १९ लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com