जलयुक्त शिवार अभियानात नागपूर जिल्हा अव्वल - विभागीय आयुक्त अनुपकुमार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

नागपूर - दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करून टॅंकरमुक्त महाराष्ट्र  करण्यासाठी शासनातर्फे जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या अभियानाची  यशस्वीपणे अंमलबजावणीकरिता नागपूर जिल्ह्याने विभागीय स्तरावरील पहिला पुरस्कार मिळविल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी गुरुवारी (ता. २२) येथे पत्रकार परिषदेत दिली. 

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत विभागस्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार व जिल्ह्यास्तरावर पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार दिला जातो. २०१५-१६  मध्ये नागपूर विभागात हे अभियान यशस्वीपणे राबविणारे जिल्हे, तालुके, गाव आणि या उपक्रमाला प्रसिद्धी देणाऱ्या पत्रकारांच्या पुरस्काराची घोषणा अनुपकुमार यांनी केली. 

प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने गुणांच्या आधारावर पाच गावे व दोन तालुक्‍यांची पुरस्कारासाठी निवड केली. जिल्हास्तरीय समितीकडून विभागीय स्तरावर प्राप्त झालेल्या प्रस्तावांना विभागीय समितीने गुण दिले. त्यातून विभागीय पुरस्कारासाठी दोन गावे, दोन तालुके आणि दोन जिल्ह्यांची निवड केली. 

याच पद्धतीने पत्रकारांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण लवकरच एका कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे अनुपकुमार यांनी सांगितले.

राजामाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार विभागीय
नागपूर जिल्हा प्रथम        १५ लाख रुपये
गोंदिया जिल्हा द्वितीय    १० लाख रुपये

विभागीय स्तरावरील तालुका
प्रथम पुरस्कार    काटोल तालुका (जिल्हा नागपूर)    १० लाख रुपये
द्वितीय पुरस्कार    चिमूर तालुका (जिल्हा चंद्रपूर)    ७ लाख ५० हजार रुपये

विभागीय स्तरावरील गाव 
प्रथम पुरस्कार    मुत्तापूर (ता. अहेरी, जि.गडचिरोली)    ७ लाख ५० हजार रुपये
द्वितीय पुरस्कार    गंगाझरी (तालुका व जिल्हा गोंदिया)    ५ लाख रुपये

Web Title: nagpur vidarbha news nagpur district topper in jalyukta shivar campaign