भारनियमनाविरुद्ध राष्ट्रवादीचा एल्‍गार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

नागपूर - राज्यभरात सुरू असलेल्या भारनियमनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एल्गार पुकारत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा होतील, या हवाई घोषणेप्रमाणेच दोन महिन्यांपूर्वी भाजप सरकारने केलेला वीजस्वयंपूर्णतेचा दावाही जुमलाच असल्याचा आरोप माजी मंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी केला.
ऐन परीक्षेचा कालावधी आणि पिकांना पाण्याची गरज असताना जनतेवर भारनियमन लादण्यात आले आहे. 

हेच का अच्छे दिन, अशी विचारणा करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. लोडशेडिंग बंद करा, महाराष्ट्र सरकार मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. लोडशेडिंग तातडीने रद्द करा, शेतकऱ्यांना वीजमाफी द्या या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्यामार्फत शासनाला पाठविण्यात आले. 

अनिल देशमुख म्हणाले की, आधीच कंबरडे मोडलेला शेतकरी लोडशेडिंगमुळे पूर्णत: हतबल झाला आहे. गरज असूनही शेतकरी पिकांना पाणी देऊ शकत नाहीत. राज्यात परीक्षा सुरू असून लोडशेडिंगमुळे विद्यार्थी चिंतेत पडला आहे. उद्योजक, कारखानदार, दुकानदारांसह सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी २२ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारला पत्राद्वारे कोळशाअभावी वीजकेंद्र अडचणीत येण्याची शक्‍यता कळविली होती. यानंतरही कोळशाचे नियोजन का करण्यात आले नाही, असा सवाल देशमुख यांनी केला. माजी मंत्री आणि राकाँचे शहराध्यक्ष अनिल देशमुख व जिल्हाध्यक्ष रमेश बंग यांच्या नेतृत्वातील आंदोलनात प्रवीण कुंटे, राजाभाऊ टाकसाळे, दीनानाथ पडोळे, ईश्वर बाळबुधे, अनिल अहीरकर, दिलीप पनकुले, दुनेश्वर पेठे, अलका कांबळे, नूतन रेवतकर, राजू नागूलवार आदींचा प्रामुख्याने समावेश होता.

Web Title: nagpur vidarbha news ncp agitation for loadshading