नागपूर विद्यापीठाला रॅंकिंगच नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

नागपूर - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट रॅकिंग फ्रेमवर्कअंतर्गत देशभरातील विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांचे ‘रॅंकिंग’ जाहीर करण्यात आले. यात नॅकचा ‘अ’ दर्जा मिळविणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला यात स्थानच दिलेले नाही. नागपूरसाठी अभिमानाची एकमेव बाब म्हणजे येथील व्हीएनआयटीने देशातून ३१ वे स्थान पटकावले आहे. 

व्हीएनआयटीने प्रगती करून आपले स्थान आणखी वर केले आहे. मागील वर्षी ४२ व्या स्थानावर असलेली व्हीएनआयटी यंदा ३१ व्या क्रमांकावर आली आहे. देशातील विद्यापीठांचे तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे रॅंकिंग ठरविण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रस्ताव मागविले होते. देशभरातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयांनी हे प्रस्ताव जानेवारीत सादर केले होते.

नागपूर विद्यापीठ तसेच जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचादेखील यात समावेश होता. सोमवारी जाहीर झालेल्या यादीत नागपुरातील सर्वच संस्था राष्ट्रीय पातळीवर माघारल्याचे दिसून आले. ‘व्हीएनआयटी’चा अपवाद वगळता एकाही अभियांत्रिकी महाविद्यालयाला पहिल्या ५० मध्ये स्थान मिळविता आलेले नाही. मागील वर्षी अभियांत्रिकी देशातील टॉप फार्मसी महाविद्यालयांमध्ये नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसीला ४४ वे रॅंकिंग मिळाले आहे.

Web Title: nagpur vidarbha news no ranking nagpur university