अकरावी प्रवेशाची आता दुसरी संधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

नागपूर - अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीमध्ये अद्याप ऑनलाइन अर्ज न केलेल्या तसेच अर्जाचा दुसरा भाग अपूर्ण भरलेल्या विद्यार्थ्यांनाही संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना अर्जाच्या दुसऱ्या भागात महाविद्यालयांचे पसंतीक्रम, इतर माहितीत बदल करता येणार असून, त्यासाठी मंगळवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

नागपूर - अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीमध्ये अद्याप ऑनलाइन अर्ज न केलेल्या तसेच अर्जाचा दुसरा भाग अपूर्ण भरलेल्या विद्यार्थ्यांनाही संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना अर्जाच्या दुसऱ्या भागात महाविद्यालयांचे पसंतीक्रम, इतर माहितीत बदल करता येणार असून, त्यासाठी मंगळवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

केंद्रीय प्रवेश समितीमार्फत केंद्रीय पद्धतीने अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेतील पहिली प्रवेश फेरी शुक्रवारी पूर्ण झाली. या फेरीत पहिले ऑप्शन भरणाऱ्या २६ हजार ११३ हजार विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ५३६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. पहिल्या पसंतीक्रमानुसार निवड झालेल्या उर्वरित विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. समितीच्या निर्णयानुसार या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत सहभागी होता येणार नाही. या फेरीत अद्याप ऑनलाइन अर्ज न केलेले, दुसरा भाग अपूर्ण भरलेले तसेच पहिल्या फेरीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल. ऑनलाइन अर्ज भरणे तसेच अर्जात बदल करण्यासाठी १८ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. शनिवारी दुपारी रिक्त जागांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. तसेच अर्जात बदल करण्यासाठीही लिंक सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे दहावीचे बैठक क्रमांक ब्लॉक केले जाणार आहे. त्यामुळे अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी नवीन माहिती पुस्तिका घेऊन नव्याने पुन्हा अर्ज भरू नये, असे समितीने स्पष्ट केले आहे. 

असा बदला पसंतीक्रम
विद्यार्थ्यांना आपल्या लॉगीनमध्ये जाऊन माय प्रोफाईल यातील ‘एडिट युवर चॉईस’ या लिंकवर जावे लागेल. पसंती क्रमात बदल करण्यापूर्वी ‘प्रिंट’ या बटणवर क्‍लिक करू नये. अन्यथा जुने पसंतीक्रम कायम राहतील. ‘चॉईस फॉर सेंट्रलाईज्ड’ या पानावर पसंतीक्रमांचा क्रम बदलणे किंवा यापैकी काही काढून टाकणे किंवा काही नव्याने समाविष्ट करणे या प्रकारचे बदल करता येतील. आवश्‍यक बदल केल्यानंतर ‘सेव्ह बटणवर क्‍लिक’ करावे. हे बदल मान्य आहेत का, अशी विचारणा होईल. मान्य असल्यास ओके बटणवर क्‍लिक करावे. नसल्यास कॅन्सल करून नव्याने बदल करावेत. 

अद्याप ऑनलाइन अर्ज न भरलेले विद्यार्थी
अद्याप ऑनलाइन अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका घेऊन त्यातील लॉगीन आयडी व पासवर्डचा वापर करून लॉगीन करावे. माहिती पुस्तिकेतील सूचनांप्रमाणे भाग पूर्ण करावा.  त्यानंतर मार्गदर्शन केंद्रांकडून आवश्‍यक कागदपत्रे दाखवून व तपासून ‘अप्रूव्ह’ करून घ्यावा. त्यानंतर अर्जाचा भाग व पसंतीक्रम भरता येतील.

Web Title: nagpur vidarbha news Now there is another chance for eleven entrants