पालकांचा अट्टहास विद्यार्थ्यांच्या ‘फेल्युअर’साठी कारणीभूत - प्रकाश सोमलवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

नागपूर - भविष्यात काय करायचे, याबाबत विद्यार्थी जागरूक आहेत. पण, पाल्यांनी  काय करावे, याबाबत पालकच कन्फ्यूज आहेत. मुलांच्या आवडी-निवडी लक्षात न घेता विद्यार्थ्यांवर शिक्षण लादले जाते. याच अट्टहासामुळे विद्यार्थ्यांवर फेल्युअरची वेळ येत  असल्याचे निरीक्षण सोमलवार एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रकाश सोमलवार यांनी नोंदविले. ‘सकाळ’ कार्यालयात मंगळवारी ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये ते बोलत होते. काळानुरूप पालकांच्या भूमिकेत फार मोठा फरक झाला आहे. 

बदललेल्या शिक्षण पद्धतीमुळे होणारे पालकांचे कन्फ्यूजन लक्षात घेऊन त्यांना जागरूक करणे काळाची गरज आहे. यासाठी सोमलवार एज्युकेशन सोसायटीतर्फे पालकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. त्यामाध्यमातून शाळेशी संबंधित बाबी सोडून पालकांनी काय करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पालकांनी मुलांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांना मनाप्रमाणे शिकू द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सर्व सुशिक्षित व्हावेत या चांगल्या भावनेतून शासनाकडून कॉलेजेसना सुसाट परवानग्या दिल्या जात आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणावर जागा रिकाम्या राहत आहेत. सीबीएसई शाळांकडे  पालकांचा कल अधिक आहे. पण, शिक्षणाच्या खासगीकरणामुळे शिक्षण आवाक्‍याबाहेर जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 

शासकीय शाळा व्रतस्थ संस्थांना चालवू द्या
शिक्षण क्षेत्रातून शासनाकडून हात काढून घेतला आहे. अशा स्थितीत शिक्षण क्षेत्रासाठी स्वतंत्र यंत्रणा निश्‍चित करणे आवश्‍यक आहे. त्याशिवाय जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळा चांगले काम करणाऱ्या त्या भागातील व्रतस्थ शिक्षण संस्थांना चालवायला द्याव्या. शाळांमधील शिक्षक किंवा विद्यार्थी डिस्टर्ब होऊ न देता शाळांचा दर्जा सुधारला जाऊ शकतो. विद्यार्थीही तिथे स्मार्ट होतील, असा विश्‍वास सोमलवार यांनी व्यक्त केला. 

‘फाइव्ह डेज वीक’ला विरोध
पाच दिवसांचा आठवडा या प्रकाराला सोमलवार यांनी तीव्र विरोध दर्शविला. शनिवारी अर्धाच दिवस शाळा असते. त्यातही हा दिवस वेगवेगळ्या ‘ॲक्‍टिव्हीटी’साठी मोकळा असतो. सामूहिक पीटी, भाषण यामुळे मुलेही खूश होतात. यामुळे सहा दिवसांची शाळाच योग्य असल्याचे ते म्हणाले.

Web Title: nagpur vidarbha news Parents 'attitudes cause for students' failures