हे सरकार जाहिरातबाज - राधाकृष्ण विखे-पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 डिसेंबर 2017

नागपूर - राज्यातील शेतकरी असो, विद्यार्थी वा सामान्य नागरिक, सर्वच स्तरावर सरकार अपयशी ठरले आहे. केवळ फसव्या घोषणा आणि जाहिरातबाजी करून भुरळ घालणारे भाजप सरकार असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.

नागपूर - राज्यातील शेतकरी असो, विद्यार्थी वा सामान्य नागरिक, सर्वच स्तरावर सरकार अपयशी ठरले आहे. केवळ फसव्या घोषणा आणि जाहिरातबाजी करून भुरळ घालणारे भाजप सरकार असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.

शेतकऱ्यांना हमीभाव देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. दुसरीकडे बोंडअळीमुळे लाखो शेतकऱ्यांचे पीक गेले. ‘महिको माँन्सेंटो’ कंपनीवर कुठलीही कारवाई करण्यात येत नाही. कंपनीला पाठीशी घालण्याचे काम सरकार करीत आहे. दुसरीकडे विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ देण्याची गोष्ट सत्ताधारी करीत आहेत. त्यातून रिलायन्ससारख्या कंपन्यांना फायदा देण्याचे काम सरकार करणार आहे. कर्जमाफी, हमीभाव न देता केवळ मोठमोठी भाषणे केली जात असल्याची टीका विधानसभेत २९३ अन्वये चर्चेचा प्रस्ताव सादर करताना विखे-पाटील यांनी केली.

आदिवासी विकासाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत आश्रमशाळेत ८१ मुलांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय सातत्याने कुपोषणाचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट केले. सामाजिक न्याय विभागाने आदिवाशी विभागाचा दोन कोटींचा निधी वळविल्याचे स्पष्ट केले. तीन वर्षांत ६७ हजार बालमृत्यू झाले.

मात्र, उपाययोजना करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या बैठकीत मंत्र्यांची अनुपस्थितीवर पाटील यांनी आक्षेप घेतला. यानंतर राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनीही शासनाच्या कर्जमाफीसह इतर विषयांवर समाचार घेतला.

केवळ जाहिराती करून सरकार गवगवा करीत असल्याची टीका केली. सत्ताधाऱ्यांतर्फे राजेंद्र पाटणी यांनी समाजकल्याण, आश्रमशाळेत झालेल्या विविध भ्रष्टाचारांच्या चौकशीसाठी एसआयटी लावण्याची मागणी केली. जितेंद्र आव्हाड यांनीही सरकारच्या धोरणावर चांगलेच तोंडसुख घेतले. यावेळी सुभाष सावंत, पंडितराव पाटील व गोपालदास अग्रवाल यांनी चर्चेत सहभाग नोंदविला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur vidarbha news radhakrishna vikhe patil talking