मानेवाड्यातील एसके बारवर छापा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

नागपूर - गुन्हे शाखेचे एसीपी सोमनाथ वाघचौरे यांनी शनिवारी रात्री मानेवाड्यातील एसके बारवर छापा घातला. बारमध्ये प्रतिबंध असतानाही ग्राहकांना दारू पाजण्यात येत होती. उत्पादन शुल्क विभागातर्फे जप्त केलेली दारूही येथे विकण्यात येत होती. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.
मानेवाडा रिंग रोड चौकात विलास माणिकराव करांगडेचा एस. के. बार आहे.

विलास हा राजकीय पक्षातील आमदारांचा निकटवर्ती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतिबंध असतानाही ग्राहकांना दारू देण्यात येत असल्याची \माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे एसीपी वाघचौरे यांनी पथकासह रात्री ८.३० च्या सुमारास बारवर धाड टाकली. रेस्टॉरंटच्या नावाखाली येथे बार चालत होता. पोलिसांनी कारवाईचा व्हिडिओही तयार केला आहे.

एसीपी वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिबंधानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बारमध्ये ठेवलेली दारू एका खोलीत ठेवून सील केले होते. परंतु, विलासने सील तोडून दारूची ग्राहकांना विक्री सुरू केली. या कारवाईत मोठा दारूसाठा सापडला आहे. या प्रकरणात बार संचालकावर दारूबंदी कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अवहेलना केल्याचा गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: nagpur vidarbha news raid on sk bar