पावसाची तीन तास धुवाधार बॅटिंग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

नागपूर - महिनाभर रुसलेल्या पावसाने शुक्रवारी रात्री धुवाधार बॅटिंग केली. सुमारे तीन तास पाऊस कोसळल्याने यंदाच्या हंगामातील अर्धा अनुशेष पावसाने एकाच दिवशी भरून काढला. नागपूर विभागात चोवीस तासांत सरासरी ५२.५१ मिलिमीटर पाऊस कोसळला. यामुळे नागपूर शहरावरचे जलसंकट थोडे दिवस टळणार आहे. 

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्‍यात सर्वाधिक १५१.२० मि.मी., कामठी तालुक्‍यात १४२.६०मि.मी., नागपूर ग्रामीण १४१.९० मि.मी., मौदा तालुक्‍यात १३७.०० मि.मी., पारशिवनी तालुक्‍यात ११७.३० मि. मी. पावसाची नोंद झाली.

नागपुरात दाणादाण
शुक्रवारी रात्री धुवाधार पावसाने शहरात दाणादाण उडाली. नागनदी व पिवळी नदी ओसंडून वाहत होती. रस्तेही जलमय झाले होते. खोलगट भागातील घरांमध्ये पाणी शिरले. तब्बल तीन तास पावसाने शहराला ठप्प केले होते. रात्री साडेआठ वाजतापासून पावसाला सुरुवात झाली. रात्री साडेबारा वाजता पावसाने उसंत घेतली.

Web Title: nagpur vidarbha news rain