अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

नागपूर - प्रेमसंबंधातून मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी १७ वर्षीय विधीसंघर्ष मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित १५ वर्षीय मुलगी व विधीसंघर्ष मुलगा एकाच वस्तीत राहतात.

नागपूर - प्रेमसंबंधातून मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी १७ वर्षीय विधीसंघर्ष मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित १५ वर्षीय मुलगी व विधीसंघर्ष मुलगा एकाच वस्तीत राहतात.

एक वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. मुलाने तिला लग्नाचे आमिष दाखविले होते. त्यानंतर तिला घरी बोलावून तसेच सेमिनरी हिल्स येथे नेऊन बलात्कार केला. २१ सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी मुलगा भिंत ओलांडून मुलीच्या घरी गेला होता. त्यावेळी हा प्रकार मुलीच्या वडिलांच्या लक्षात आला. मुलीच्या वडिलांनी मुलाला खडसावले. त्याचप्रमाणे मुलीला घेऊन जरीपटका पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार केली. परंतु, दोघेही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी दोन्ही कुटुंबीयांची समजूत काढली. त्यानंतर पोलिस ठाण्यातच मुलीने मी वडिलांच्या घरी राहणार नाही असे सांगितले. त्यावरून तिची महिला सुधारगृहात रवानगी केली. सुधारगृहातील शिक्षकांनी तिची विचारपूस केली असता त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याची कबुली दिली. त्यावरून सुधारगृहातील कर्मचाऱ्यांनी जरीपटका पोलिसात तक्रार केली.

चिमुकलीवर अत्याचार
पाणी पाजण्याच्या बहाण्याने घरी नेऊन ३ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी छबी देवांगन (२८) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. छबी देवांगन व पीडितेचे वडील हे बिडगाव येथील बिट्टू शाहू यांच्या धर्मकाट्यावर काम करतात. छबी हा धर्मकाटा परिसरात असलेल्या इमारतीत राहतो. ५ ऑक्‍टोबरला रात्री १० च्या सुमारास मुलीला घेऊन तिची आई धर्मकाट्यावर गेली. त्यावेळी मुलीला तहान लागल्याने छबीने तिला घरी नेऊन अत्याचार केला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: nagpur vidarbha news rape