चारित्र्यहननप्रकरणी निवृत्त फौजदारास अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

नागपूर - जिल्ह्यातील एका प्रगत ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाचे चारित्र्यहनन करणारा मजकूर असलेले पत्रक घरोघरी पोहोचवून बदनामी केल्याप्रकरणी निवृत्त फौजदार रामराव कळंबे यास पोलिसांनी अटक केली. त्याची सध्या जामिनावर सुटका झाली असून, त्याचे साथीदार मात्र मोकळे आहेत. या प्रकरणात पोलिसांनी भादंवि ३५४ ‘अ’ आणि ५०६ कलमानुसार गुन्हा नोंद केला. 

तनिष्का गटाच्या गटसमन्वयक असलेल्या महिला सरपंचाच्या कार्याची दखल घेऊन विविध वृत्तपत्रांत विशेष लेख प्रकाशित झाले होते.

त्यावर टिपणी करीत निवृत्त फौजदार रामराव कळंबे याने चारित्र्यहनन करणारा मजकूर छापून त्याचे पत्रक वृत्तपत्राच्या माध्यमातून घरोघरी पाठविले. या प्रकरणात ग्रामपंचायत सदस्य विनोद सावरकर यासही पोलिसांनी ताब्यात घेतले होते, तर वर्तमानपत्र विक्रेत्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. आता मुख्य आरोपी फौजदार रामराव कळंबे याच्याविरुद्ध भादंवि ३५४ ‘अ’ आणि ५०६ कलमानुसार गुन्हा नोंद करून अटक केली. या प्रकरणी सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी विजया ठाकरे, रामेश्वरी लोंढे, लता क्षीरसागर, दुर्गा लोंढे, पंचायत समिती उपसभापती छायाताई वंजारी, ग्रामपंचायत सदस्य मंगेश भोजने, क्रिष्णा गेचुडे, रतन वासनिक, शोभाताई थूलकर, शैला अतकरे, उषा उईके, अरुणा मेश्राम, रजनी वांढरे, नवरगावचे सरपंच भगवंता गोंगले यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहायक पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्याकडे निवदेनातून केली.

Web Title: nagpur vidarbha news retired police officer arrested