'संघ' कूस बदलतोय?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमांना मुसलमान व दलित धर्मगुरूला प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आले आहे. त्यामुळे संघाच्या प्रतिमेला बदलण्याच्या जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे काय? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

संघ स्थापनेपासून हिंदूंचे संघटन करणारी संघटना म्हणून रा. स्व. संघाची प्रतिमा साऱ्या दुनियेत आहे. या प्रतिमेला तोडण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून जाणीवपूर्वक केला जात आहे. संघाचे प्रमुख पदाधिकारी इंद्रेशकुमार मुसलमानांचे संघटन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातूनच संघाने राष्ट्रीय मुस्लिम परिषदेची स्थापना केली. इंद्रेशकुमार यांनी रमजान महिन्यांतील इफ्तार पाटींनाही हजेरी लावली आहे. आता पुढचे पाऊल म्हणून रेशीमबागेत होणाऱ्या विजयादशमीच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंजाबमधील जालंधर येथील शीख समाजातील दलित धर्मगुरू रोविदास साधुसंत सोसायटीचे प्रमुख बाबा निर्मलदास महाराज उपस्थित राहणार आहेत.

नागपुरात दरवर्षी बाल स्वयंसेवकांचे विजयादशमी व शस्त्रपूजनाचे स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदा सदर भागातील गिट्टीखदान येथील विजयादशमीच्या कार्यक्रमास नागपुरातील होमिओपॅथी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. मुन्वर युसूफ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यामुळे केवळ हिंदूंचे संघटन अशी तयार झालेली पारंपरिक प्रतिमा बदलण्याचा संघाचा प्रयत्न आता सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

Web Title: nagpur vidarbha news rss