आरटीई प्रवेशाला दुसऱ्यांदा मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

नागपूर - इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांवर सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत शाळांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालकांना आरटीईअंतर्गत प्रवेश घेणे कठीण झाले आहे. शाळांच्या विविध अडचणींमुळे नागपुरातील शाळांमधील चार एप्रिलपर्यंत केवळ तीन हजार ३३ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे.

प्रवेशासाठी दिलेली मुदत बुधवारी संपल्याने पुन्हा दहा एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा विविध माध्यमांच्या, विविध व्यवस्थापनांच्या शाळेत राखीव असतात. या शाळांसाठी ऑनलाइन लॉटरी राबविण्यात आली होती. त्या प्रक्रियेच्या आधारे विद्यार्थ्यांना शाळा देण्यात आल्या. या प्रवेशासाठी सुमारे २५ हजार अर्ज शिक्षण विभागाकडे आले होते. आरटीईअंतर्गत राखीव असलेल्या सहा हजारांवर जागा नागपूर जिल्ह्यात आहेत. यापैकी लकी ड्रॉ काढण्यात आलेल्या पाच हजार ३५७ जागांवर प्रशासनामार्फत प्रवेश देण्यात येणार होते.

चार एप्रिलपर्यंत हे प्रवेश होणे अपेक्षित होते. यापूर्वीही एकदा प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, मुदतवाढ देऊनही आतापर्यंत ३ हजार ३३ जागांवरच प्रवेश निश्‍चित झाले आहेत. अर्ज करणाऱ्यांची संख्या प्रचंड असताना प्रवेशांसाठी पालक फिरकलेले नाहीत. दुसरीकडे अनेक पालकांना शाळांकडून विविध कागदपत्रांची पूर्तता करण्याची अट घातली जात असल्याने अनेकांचे प्रवेश रखडले आहेत. त्यामुळे दुसऱ्यांदा प्रवेशाची तारीख वाढविण्यात आली आहे. अनेकांना मनासारखी शाळा न मिळाल्यानेही प्रवेश होत नसल्याने प्रवेश नाकारले जात असल्याची माहिती आहे.

Web Title: nagpur vidarbha news RTE admission